ताज्याघडामोडी

खा.निंबाळकर,राजेंद्र पवार आणि अभिजित पाटील यांच्या बैठकीत नक्की चर्चा कशाची ?

२५२ पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते मतदार संघात ठाण मांडून असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पोटनिवडणुकीतील भगिरथ भालके यांचा विजय हा राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकार बाबत नागरिकांनी दिलेला कौल असणार आहे हे लक्षात घेत मागील दोन दिवस मतदार संघात मुक्काम ठोकून परिचारक सर्मथक असलेल्या काही स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या व भगिरथ भालके याना सहकार्य करण्याचे आवाहन केले.मात्र आज एकीकडे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पाटील हे पंढरपूर शहरात विविध ठिकाणी सभा घेऊन भगिरथ भालके यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत असतानाच त्यांचे पिताश्री राजेंद्र पवार हे मात्र आज पंढपुरात येऊन भगिरथ भालके यांच्या पराभवाचा चंग बांधलेल्या खा.रणजित निंबाळकर यांची भेट घेतात आणि या भेटीच्या वेळी विठ्ठल सहकारी साखर कारखानाच्या दुरावस्थेबद्दल अतिशय रोखठोक मत मांडत आलेल्या अभिजित पाटील यांची उपस्थिती असते याचा वेगळाच अर्थ राजकीय विश्लेशकातून काढला जाऊ लागला आहे.               

या पोटनिवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची झालेली आर्थिक दुरवस्था आणि कारखाना विकला तरी कर्ज फिटणार असा सातत्याने विरोधकांकडून होत असलेला आरोप हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरला असून राजेंद्र पवार हे साखर कारखानदारीतील तज्ञ् समजले जातात,डीव्हीपी समूहाचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मागील काही महिन्यापूर्वी गुरसाळेच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक खस्ताहालीबाबत व आर्थिक अनियमतता बाबत थेट शरद पवार व राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन तक्रारी केल्या होत्या.आमदारकीच्या नादात विठ्ठल कारखान्याचे वाटोळं होतंय अशीच काही सभासदाची भावना असून आज खा.रणजित निंबाळकर,राजेंद्र पवार आणि अभिजित पाटील यांच्यात नक्की याच मुद्यावर चर्चा झाली कि हि औपचारिक भेट होती या  बाबत मात्र राजकीय गोटातून तर्क वितर्क लढविले जाऊ लागले आहेत.                  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *