गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चायनीज सेंटरवर महिलेशी झालेली ओळख डाळींब व्यापाऱ्यास पडली महागात

मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथील डाळींब व्यापाऱ्याची  मोहोळ येथील कोळेगाव चौकात चायनीज सेंटरमध्ये एका महिलेशी झालेली ओळख त्या व्यापाऱ्यास भलतीच महागात पडली असून ५० रुपयांवरून या महिलेशी ओळख झाली,मोबाईलवर संभाषण सुरु झाले आणि सदर महिला व तिच्या साथीदाराने त्या डाळींब व्यापाऱ्यास निम्म्या किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून करकंब येथील व्यवहारे वस्ती नजीकच्या रस्त्यावर बोलावून ती महिला आणि तिच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणीवरून सुरु झालेल्या वादाचे पर्यावसन तिघांच्या हत्येत सांगली शहरात खळबळ

तिहेरी हत्याकांडमुळे सांगली जिल्हा हादरला आहे. पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये वाद झाला आणि तो टोकाला पोहोचला. धारदार शस्त्राने वार करून एकाच वेळी तिघांची हत्या करण्यात आली आहे. तर या वादात चार जण अद्यापही जखमी आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती सांगली पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. सांगली जिल्ह्यातील दुधोंडी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरात भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास 

पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात सातत्याने चोरीचे प्रकार उघडकीस येत असून दुचाकी चोरीस जाण्याच्या प्रमाणात तर लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.दुचाकी चोरट्याबरोबरच आता पंढरपुरात चेन स्न्याचर देखील वावरू लागले असावेत अशी शंका  काल शनिवारी घडलेल्या घटनेवरून व्यक्त होत असून शुक्रवार दिनांक ३० जुलै रोजी भर दुपारी शहरातील भर ठिकाण असलेल्या घोंगडे गल्ली परिसरात महिलेच्या गळ्यातील दीड तोळा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळू तस्करांवर कारवाई न करण्यासाठी महिना लाखाच्या हप्त्याची मागणी

 वाळू तस्करांवर कारवाई होऊ नये म्हणून उस्मानाबादमध्ये प्रत्येक महिन्याला लाख रुपयांचा हप्ता सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हाच हप्ता स्वीकारत असताना वरिष्ठ अधिकारी मनिषा राशिनकरला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. एक लाख १० हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली परंडा तालुक्यातील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुन्ह्यात अटक केल्याचा राग धरून निलंबित पोलिसावर खुनी हल्ला

मारहाणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी आपल्याला पकडले याचा राग मनात ठेवून आरोपी आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याने निलंबित पोलिसावर दगडाने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 27) रात्री येथे घडली. याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर तुकाराम सोनके (वय 41 रा. पोलीस कॉलनी, दिघी) यांनी मंगळवारी (दिनांक 27) दिघी पोलीस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोहोरगाव येथे अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपुर तालुक्यातील पोहरगाव येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याचे समजताच पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी केलेल्या कारवाईत डम्पिंग ट्रेलर व वाळूसह ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला असून या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात 1) महेश दादाराव पाटील व 2) आकाश भारत गायकवाड दोघे रा. पोहोरगाव ,ता पंढरपुर यांच्या विरोधात भादवि 379, 34 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

फेरफार नोंदीसाठी ५ हजराच्या लाचेची मागणी

शेतीचा फेरफार नोंदीसाठी  5 हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना कालगाव येथे घडली आहे. याप्रकरणी तलाठी अनंदा नारायण गायकवाड यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने आज 26 जुलै रोजी कारवाई केली. एका तक्रारदाराने 8 जुलै रोजी समक्ष एक तक्रार दाखल करीत विकत घेतलेल्या शेतीचा फेर लावून देण्यासाठी संबंधित तलाठी अनंदा गायकवाड यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुंढेवाडी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपूर पोलीस उपविभागाअंतर्गत समाविष्ट असलेल्या चारही पोलीस हद्दीतील भीमा नदीकाठच्या गावातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असतानाच वाळू चोरी मात्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.पंढरपूर तालुक्यातील विविध गावात आतापर्यत अवैध वाळू उपशावर सर्वाधिक कारवाया या पोलिसांनी केलेल्या दिसून येतात.काही गावाच्या हद्दीत तर अवैध वाळू उपशावर पोलिसांकडून सातत्याने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मतदारांना वाटले पैसे, कोर्टाने महिला खासदाराला सुनावली 6 महिन्यांची शिक्षा

निवडणुकांच्या वेळी अनेक उमेदवारांवर पैसे वाटण्याचा आरोप होतो. परंतु देशात पहिल्यांदाच एक लोकप्रतिनिधीवर या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. तेलंगाणा राष्ट्र समितीच्या महिला खासदार मलोत कविता यांना मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कोर्टाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. कवित्या या तेलंगाणातील महबुबाबाद लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. कविता यांच्यासह त्यांच्या एका सहकार्‍यालाही ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2019 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हातात शस्त्रास्त्रे घेउन व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवणे भोवले, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

दहशत माजविण्यासाठी हातात शस्त्रास्त्र घेउन व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवणाऱ्या दोघांविरूद्ध गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. रोहन रमेश घोलप (वय 21 रा. गोखले नगर )आणि अखिल ऊर्फ गणेश विलास देशमुख (वय 30 रा. कसबा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध डेक्कन व फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलवार, कोयता, चाकू बनविणारे व […]