गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चायनीज सेंटरवर महिलेशी झालेली ओळख डाळींब व्यापाऱ्यास पडली महागात

मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथील डाळींब व्यापाऱ्याची  मोहोळ येथील कोळेगाव चौकात चायनीज सेंटरमध्ये एका महिलेशी झालेली ओळख त्या व्यापाऱ्यास भलतीच महागात पडली असून ५० रुपयांवरून या महिलेशी ओळख झाली,मोबाईलवर संभाषण सुरु झाले आणि सदर महिला व तिच्या साथीदाराने त्या डाळींब व्यापाऱ्यास निम्म्या किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून करकंब येथील व्यवहारे वस्ती नजीकच्या रस्त्यावर बोलावून ती महिला आणि तिच्या साथीदाराने मारहाण करीत ५० हजार रुपये रोख व मोबाईल काढून घेतल्याची तक्रार करकंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या बाबत करकंब पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथील गणेश बबन नामदे वय 32 वर्षे  व्यवसाय डाळींब व्यापारी यांची पंधरादिवसापुर्वी मोहोळ येथील कोळेगाव बस स्टफ येथील चायनीजमध्ये दुपारी 3/00 वाचे सुमारास चायनीज खात असताना ओळख झाली.चायनीज खाणे करीता फिर्यादीने तिला 50 रु दिले.त्यावेळी सदर महिलेने गणेश नामदे यांचा मोबाईल नंबर मागून घेतला व या मोबाईल वरून ती फिर्यादी नामदे यांच्याशी वेळावेळी बोलू लागली.सदर महिलेने नामदे यास अर्ध्या किमतीत सोने देण्याची तयारी दाखविली आणि नामदे यास बळी पडले.

सदर महिलेने 31/07/2021 रोजी सकाऴी फिर्यादी घरी असताना करकंब येथील टेम्भूर्णी रस्त्याला व्यवहारे पाटीच्या पुढे या मी रस्यात थांबली आहे तुम्ही सोने नेण्यास या सांगितले.सायंकाळी 5/30 वाजता सदर महिलेने फिर्यादीस रस्त्यापासुन पश्चिम बाजुस 500फुटावर पडीक रानात नेले .त्यावेऴी तेथे आणखी दोघेजन थांबलेले होते. त्या महीलेने भरपुर सोने दाखविले व माझेकडे 50,000/-रु मागितले.फिर्यादीने तिचेकडे दोन तोळे सोने दे असे सांगितले.त्यावेऴी तिने पहीले पैसे दाखव म्हणुन मी खिश्यातुन पैसे काढुन दाखवत असताना त्यातील एक जणाने माझे गळपट्याला पकडुन मला मारहाण करुन ५० हजार रुपये रोख व मोबाईल घेऊन पळून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *