गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळू तस्करांवर कारवाई न करण्यासाठी महिना लाखाच्या हप्त्याची मागणी

 वाळू तस्करांवर कारवाई होऊ नये म्हणून उस्मानाबादमध्ये प्रत्येक महिन्याला लाख रुपयांचा हप्ता सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हाच हप्ता स्वीकारत असताना वरिष्ठ अधिकारी मनिषा राशिनकरला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

एक लाख १० हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली

परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती.

एक लाख 10 हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांच्यासह एकाला मंगळवारी लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. दरम्यान, यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद लाचलुचपत विभागाच्या या कारवाईत महसूल विभागाचा एक वरिष्ठ दर्जाचा एक मोठा मासा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

१ लाख १० हजारांची मागणी करून तडजोडी अंती ९० हजार आणि २० हजार आरोपी जानकर याच्या हस्ते स्विकारले.

वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा लाच मागितली होती. मनिषा अरुण राशिनकर आणि कोतवाल विलास नरसींग जानकर यांना अटक करण्यात आली आहे. १ लाख १० हजारांची मागणी करून तडजोडी अंती ९० हजार आणि २० हजार आरोपी जानकर याच्या हस्ते स्विकारले. याप्रकरणी भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांच्यासह एका कोतवालास १ लाख १० हजारची लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

जेसीबी, तीन ट्रक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी लाच घेतली.

सदर घटनेप्रकरणी भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रभर चालू होती. तक्रारदार यांचा एक टीप्पर आणि त्याच्या पाहुण्यांचा जेसीबी, तीन ट्रक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी लाच घेतली असल्याचे समोर आले आहे. कारवाई करताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. यामध्ये लाचलुचपत विभागाचे अधिकारी प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद यांनी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद ब्रम्हदेव गावडे, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद यांनी ही कारवाई केली. सदर कारवाईमुळे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *