मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन नवऱ्याने बायकोला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी संगीता तुपसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुपसागर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीडमधील महिला जिल्हाध्यक्षा आहेत. त्यांच्यासह पीडितेचा पती भुजंग […]
गुन्हे विश्व
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या; परिसरात मोठा तणाव
रविवारी कर्नाटकातील शिवमोगा शहरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. यानंतर जिल्ह्यात तणावपूर्ण स्थिती दिसून येत आहे. शिवमोगा येथील तणावपूर्ण स्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी कलम 144 लावण्यात आले आह. सोबतच शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. या तरुणाची हत्या शिवमोगा येथील भारती कॉलनी स्थित पेट्रोल पंपाजवळ केली आहे. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
प्रियकराच्या मदतीने आईने केली ९ वर्षीय मुलाची हत्या
वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, प्रेमात अडसर ठरणाऱ्या ९ वर्षांच्या मुलाचा आईनं प्रियकराच्या मदतीने खून केल्याचं समोर आले आहे. सार्थक रमेश बागूल (९) असे मृत मुलाचे नाव आहे. तर संगीता रमेश बागूल (३५) व तिचा प्रियकर साहेबराव माणिकराव पवार (५२) अशी आरोपींची नाव आहेत. वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारातील जंगलातल्या […]
वसुली करणाऱ्या 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
जगाने दखल घेतलेल्या मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर मागील काही अनेक दिवसांपासून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अँटिलियाची घटना किंवा मनसुख खून प्रकरणानंतर असे प्रकार घडू नयेत, यासाठी मुंबई पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी ठोस पाऊल उचलली आहेत. कर्तव्याच्या नावाखाली पोलीस अधिकारी पैसे उकळत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी चौकशी सुरू […]
दाऊदने भारतात हल्ले करण्यासाठी तयार केले विशेष युनिट
डी-गँगच्या कटाची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली असून आपल्या एफआयआरमध्ये या कटाचा उल्लेख राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) केला आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, भारतात हल्ले करण्यासाठी एक विशेष युनिट डी-गँगचा म्होरक्या आणि भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊदने तयार केले आहे. ज्यांचे टार्गेट मोठे नेते आणि सेलिब्रिटी आहेत. एनआयएच्या एफआयआरनुसार दाऊदला त्याच्या विशेष युनिटच्या माध्यमातून भारतात हल्ले करायचे […]
माजी नगरसेविकेवर भरदिवसा गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण
अहमदनगरमधल्या राहुलीत भरदिवसा माजी नगरसेविका सोनाली गुलाब बर्डे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. राहुरी शहरात ग्रामीण रुग्णालय परिसरात भिलहाटी इथं गावठी कट्ट्यातुन गोळीबार करण्यात आला. या घटनेत सोनाली बर्डे थोडक्यात बचावल्या, त्यांच्या हाताला गोळी लागल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. राहुरी पोलिसांनी या घटनेतील काही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतलं आहे. नेमकी […]
चक्क पोलीस ठाण्यातच घेऊन गेले गावठी पिस्तूल
शेवगाव पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या केलेल्या चारचाकी वाहनातच एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. परमेश्वर बाबासाहेब पातकळ (वय 27, रा.चापडगाव, ता. शेवगाव) व सचिन विठ्ठल सोलाट (वय 23, रा. पिंपळवाडी, ता. पैठण, जि. संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पातकळ व सोलाट या दोघांविरुद्ध चंदाबाई […]
चांदीच्या कड्यासाठी नातवाने केली आजीची निर्घृण हत्या
मध्यप्रदेशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चांदीच्या कड्यासाठी नातवाने मित्राच्या मदतीने आजीची निर्घुण हत्या केल्याची संतापजनक घटना मध्यप्रदेशातील इंदूर येथे घडली आहे. याप्रकरणी राजेश बागरी (24) या आरोपी नातवासह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.इंदूरपासून अवघ्या 35 किमी अंतरावर असलेल्या छोट्याशा खुडैल गावातील राजेशला त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नात आर्थिक मदत करायची होती. त्यासाठी त्याने […]
कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीचं घृणास्पद कृत्य; अश्लील फोटो व्हायरल होताच तरुणानं संपवलं जीवन
पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाला अवघ्या आठ हजार रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या करावी लागली आहे. कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनीने कर्जाची वसूली करण्यासाठी घृणास्पद मार्ग अवलंबला आहे. अश्लील फोटो व्हायरल झाल्यानंतर पीडित कर्जदार तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा […]
शिर्डीतील साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर; पाकिस्तान कनेक्शन आलं समोर, तिघे जेरबंद
दोन वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा याठिकाणी आतंकवाद्यांनी मोठा घातपात घडवला होता. यामध्ये अनेक भारतीय सैनिक मृत्यूमुखी पडले होते. या घटनेनंतर बरोबर दोन वर्षांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा बेत असल्याची खळबळजनक माहिती ATS च्या तपासात समोर आली आहे. गुजरात एटीएसने दुबईहून आलेल्या तीन जणांना अटक केली असून त्यांनी […]











