गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चांदीच्या कड्यासाठी नातवाने केली आजीची निर्घृण हत्या

मध्यप्रदेशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चांदीच्या कड्यासाठी नातवाने मित्राच्या मदतीने आजीची निर्घुण हत्या केल्याची संतापजनक घटना मध्यप्रदेशातील इंदूर येथे घडली आहे.

याप्रकरणी राजेश बागरी (24) या आरोपी नातवासह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.इंदूरपासून अवघ्या 35 किमी अंतरावर असलेल्या छोट्याशा खुडैल गावातील राजेशला त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नात आर्थिक मदत करायची होती.

त्यासाठी त्याने आपली 75 वर्षांची आजी जमुना हिच्याकडे चांदीचे कडे मागितले. ते कडे आजीने तिच्या दोन्ही पायात घातले होते. मात्र आजीने त्याला ते कडे देण्यास सप्ष्ट नकार दिला. त्यामुळे राजेशला आजीचा प्रचंड राग आला.

संतापलेल्या राजेशने आपला मित्र विजय ढोली याच्या मदतीने आजीच्या हत्येचा कट रचला. या कटानुसार आजीच्या जेवणात 11 फेब्रुवारी रोजी त्याने विषारी पदार्थ मिसळला. ते जेवण जेवल्यानंतर आजी बेशुद्ध झाली. ती बेशुद्ध झाल्यावर आरोपींनी तिची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर निर्दयीपणे कुऱ्हाडीने दोन्ही पाय तोडून चांदीचे कडे काढून घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातवाने आजीचे दोन्ही कडे एका परिचीत चालकाकडे गहाण ठेवून 6000 रुपये घेतले. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *