गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

न्याय मिळत नाही म्हणत पेट्रोलचे कॅन,कोयते हातात घेऊन कुटूंब करकंब पोलीस ठाण्यात

आत्महत्येचा प्रयत्न आणि दहशत माजविल्याचा गुन्हा दाखल मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी करकंब पोलीस ठाण्यात थरारक प्रकार घडला असून सकाळी 09/52 वा सुमारास पोलीस ठाणेस समोर गेटमधुन टाटा कंपनीची छोटा हत्ती एम एच 13 सी यु 7745 ही टमटम पोलीस ठाणे आवारामध्ये थांबली त्यामधुन मेंढापुर गावचे रहीवाशी असलेले पप्पु थोरात याने प्लस्टीकचे कन हातामध्ये धरुन उतरले.त्यानंतर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरात एकाच दिवशी ८ मटका एजंट ”फिगर” घेताना आढळले

सोमवार दिनांक १३ सप्टेंबर हा दिवस म्हणजे घरोघरी गौरी पूजनाचा दिवस.गौरी आगमन झाले कि अनेक कुटूंबातील कुटूंबकर्ते आजही तीन दिवस अनावश्यक रोखीचे आर्थिक व्यवहार थांबवत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळते. मात्र  आकस्मात धनलाभ होण्याची आशा बाळगून असलेले काही ”अभ्यासू” गुंतवणूकदार  सोमवार पासून नवीन लाईन सुरु होईल या आशेने शनिवार रविवार दोन दिवस घमासान अभ्यास […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नी आणि सासूच्या छळास कंटाळून बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

पत्नी आणि सासूच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरूण बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणीकाळभोर परिसरातील कदमवाक वस्तीवर घडली आहे. कुटुंबियांपासून वेगळे राहण्यास भाग पाडणे, घरच्यांसोबत बोलू न देणे असा त्रास या दोघींनी पीडित तरूणाला दिला होता. या छळाला कंटाळून तरूणाने स्वयंपाकघरात गळफास घेउन आत्महत्या केली. रोहित असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खेडभोसे येथील तरुणाचा विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप

लग्नास नकार देत असल्याच्या कारणाने खेडभोसे येथील एका तरुणाचा विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा असल्याच्या प्रकरणातील ९ आरोपींचा अटकपूर्व जामीन येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.बी.लंबे यांनी मंजूर केला आहे.  ११ जून २०२१ रोजी रात्री १० वाजता खेडभोसे येथील सोमनाथ रामचंद्र पवार या तरुणास जीवे मारण्याच्या उद्देशाने या प्रकरणातील आरोपी कालिदास साळूंखे,कांतीलाल साळूंखे,मधुकर चव्हाण,अंकुश पाटील,शिवाजी पवार,सिद्धेश्वर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातून पुन्हा दोन मोटारसायलची चोरी

पंढरपूर शहरातील गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या मोटारसायकली चोरटे हातोहात लंपास करत असल्याच्या घटना गेल्या काही महिन्यात वारंवार घडत असून आता पुन्हा ७ व ८ सप्टेंबर रोजी शहरातून दोन मोटर सायकली चोरटयांनी लंपास केल्या आहेत.या प्रकरणी दोन्ही मोटार सायकलच्या मालकांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या बाबत दाखल फिर्यादीनुसार मकरंद पुरुषोत्तम कुलकर्णी रा.गोविन्दपुरा पंढरपुर यांचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूरात मॉर्निग वॉक वरून परतणाऱ्या डॉक्टर पत्नीचे सव्वालाखाचे मंगळसूत्र लंपास

पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसून येते.मोटार सायकल चोरीच्या घटना तर नित्याची बाब झाली असून अनेकवेळा भरदिवसा चोरटे आपला कार्यभाग साधत असल्याचेही दिसून येते.शहरातील धनिकांची वसाहत समजल्या जाणाऱ्या परदेशी नगर सारख्या काही उपनगरात घरफोडी व छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी भरदिवसा वयोवृद्ध डॉक्टर आपल्या पत्नीसह […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिलेसोबत अश्लील संभाषण करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला चोप, धक्कादायक प्रकार

महिलेशी सोशल मीडियावर मैत्री करत अश्लील संभाषण करणाऱ्या एका मंत्रालयातील अधिकाऱ्याला पीडित महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. सामाजिक संस्था नोंदणी करून देण्याचा बहाण्याने सदर अधिकारी या महिलेशी सलगी करत होता. मारहाणीचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवाजी आव्हाड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी महिलांनी पोलिसांकडे दाद मागितली, मात्र पोलिसांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शरद पवार,देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांच्या विरोधात अश्लील भाषेच्या पोस्ट

राज्यातील आजी माजी मंत्र्यांची बदनामी करणार्‍या फेसबुक वापरकर्त्यां विरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, https://www.facebook. com/rahul. mule. 37853 हे फेसबुक खाते वापरणाऱ्याने त्याच्या फेसबुक खात्यावरुन वेगवेगळया अश्लिल व घाणेरडया भाषेमध्ये पोस्ट केल्या. तसेच काही पोस्टला रिप्लाय देणा-या लोकांना असभ्य भाषेत रिप्लाय दिला. काही पोस्टमध्ये मराठा समाजाच्या लोकांच्या भावना दुखावून दोन समाजामध्ये […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चंदनतस्करीत चक्क सरपंचच निघाला आरोपी

चंदनतस्करी करणाऱया दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, या चंदनतस्करीमध्ये आणखी दोघांची नावे समोर आली असून, तो एका पक्षाचा सरपंच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सहा किलो चंदन व दुचाकी असा सुमारे एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. अमर नामदेव पवार (वय 30, रा. आडवी पेठ, प्रगती शाळेसमोर राहुरी), विजय रामदास पवार (वय 38, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले

वडिलांच्या नावे परवाना असलेले बार रेस्टोरेंटमधील स्टॉक रजिस्टर व गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालामध्ये तफावत असल्याचे दाखवून कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. तक्रारदार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्काच्या अधिका-यांनी कारवाईपासून वाचण्यासाठी 50 हजाराची मागणी केली होती. 40 हजार रूपये लाच स्विकारताना मलकापूर अर्बन बँकेसमोर रंगेहात पकडले. आरोपी संजय उत्तमराव केवट (46) दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि खासगी […]