पोलीस आणि महसूल प्रशासन कारवाई करण्यात दमेना पण अवैध वाळू उपसा काही थांबेना अशी परिस्थिती पंढरपुर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावांची झाली असल्याचे दिसून येत आहे.कधी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाकडून,कधी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलयातील विशेष पथकाकडून तर कधी विविध पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून अवैध वाळू उपशावर कारवाई केल्याच्या घटना वारंवार घडत असतात.तर अधून मधून महसूल […]
गुन्हे विश्व
वीज कनेक्शन कट केल्याने महावितरणच्या वायरमनला मारहाण
गतवर्षी राज्यात कोरोनाचा कहर सुरु होताच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली राज्यभरात मोठ्या प्रमाणात वीजबिले थकण्यास सुरुवात झाली.राज्य सरकार वीजबिलात किमान ५० टक्के तरी माफी देईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आणि सर्वसामान्य वीजग्राहकांचे वीजबिल मोठ्या प्रमाणात थकू लागले,राज्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी दिवाळी पूर्वी गोड बातमी देऊ म्हणत वीजबिल माफीच्या मुद्द्याला पुन्हा हवा दिली आणि वीजबिल वसुलीसाठी […]
भटुंबरे येथे अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई
पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे हद्दीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असली तरी येथून होणारी अवैध वाळू चोरी हा पोलीस प्रशासनास डोकेदुखी ठरला आहे असेच म्हणावे लागेल.काल शनिवार दिनांक 18/09/2021 रोजी रात्री ९ चे सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना भटुंबरे येथून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी […]
‘आयुष्याशी खूप त्रस्त झालोय’, पत्नीला संपवत तरुणाची आत्महत्या, अवघ्या 11 दिवसांचं बाळ पोरकं
सहारनपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आधी आपल्या पत्नीची विष पाजून हत्या केली. त्यानंतर स्वत:ने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे या दाम्पत्याच्या घरात अवघ्या 11 दिवसांपूर्वी बाळाचा जन्म झाला होता. आई-वडिलांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने अवघ्या 11 दिवसांचं बाळ पोरकं झालं आहे. मृतक तरुणाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून इतक्या टोकाचं पाऊल उचललं […]
भारताविरोधात पाकिस्तानचा ‘हनी ट्रॅप’; ISI एजंटला महिती पुरवणा-या दोघांना अटक
भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम सुरू केल्यानं पाकिस्तानचा तीळपापड झालाय. पाकचा घुसखोरीचा प्लॅन फसतोय. सीमेवरही भारतीय सैन्यापुढे निभाव लागत नसल्यानं आता पाकिस्तान ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून भारताची हेरगिरी करू पाहतोय. मात्र सुरक्षायंत्रणांनी पाकिस्तानची हाही डाव हाणून पाडलाय. भारताविरोधात कुरापती करणा-या पाकिस्तानचा आणखी एका नापाक डाव उधळला गेलाय. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIनं सैन्यदलाची माहिती मिळवण्यासाठी हनी ट्रॅप […]
पतीला निलंबित केल्यानंतर महिलेचा जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जोरदार राडा
पतीला निलंबित केल्याने पत्नीने सीईओंच्या दालनात गोंधळ घातल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. जिल्हा परिषद सदस्य व नागरिकांच्या आलेल्या तक्रारीवरुन प्रशासनाने एका औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी संबंधित औषध निर्माण अधिकाऱ्याच्या पत्नीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ जिल्हा परिषदेमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सदर अधिकारी कोरेगाव तालुक्यातील […]
सात बाऱ्यावर नोंदीसाठी तलाठी झुराळे मॅडमने मागितली लाच
एखाद्या आठवड्या-पंधरवड्यात एखादा तलाठी,मंडल अधिकारी,ग्रामसेवक,कोतवाल यांच्यावर लाच लुचपत विभागाने कारवाई केल्याची बातमी नाही आली कि या राज्यातील जनतेलाही आता काही तरी चुकल्या सारखे वाटत असते, इतकी टोकाची लाचखोरी फेरफार नोंदी आणि सातबाऱ्यावरील वारस नोंदीसाठी या राज्यात होते कि काय असा प्रश्न कायम जनतेला पडलेला असतो.राज्यात लाच लुचपत विभाग वेळोवेळी कारवाई करत असताना देखील लाचखोरीचा हा प्रकार […]
पंढरपूर-कासेगाव रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाची कारवाई
पंढरपूर शहरापासून नजीक असलेल्या जुन्या कासेगाव रस्त्यावरील देशमुख वस्तीजवळ एका खोलीमध्ये कांही इसम मन्ना नावाचा तीन पत्त्याचा जुगार खेळत आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना प्राप्त होताच त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पो.स.ई.श्री.शेख, पो.ना.येलपले,पो.ना.रोंगे,पो.ना.भोसले,पो.ना.तडवी,पो.ना.यलमार,पो.ना. खिलारे,पो.कॉ. हुलजंती, पो.कॉ. लोंढे यांनी सदर कारवाई केली असून या प्रकरणी पो.ना. संजय जालींदर येलपले नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय […]
चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला; मंत्र्याने दिला होता एन्काऊंटरचा इशारा
तेलंगणातील सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपीचा मृतदेह घानपूर भागात रेल्वे रुळावर आढळला आहे. मृताच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे या मृताची ओळख पटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फरार आरोपीला अटक करून त्याचं एन्काऊंटर करण्यात येईल, आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं तेलंगणाचे […]
५० हजार रुपये दया अन्यथा बारचे स्टॉक रजिस्टर चेक करू
दारूप्रेमी लोकांना उगीचच रस्त्यावरील एखाद्या वडापावच्या,भेळच्या गाडीवर,गावातील कुठल्या तरी शेवचिवडा हॉटेलमध्ये थांबून वाईन शॉप मधून विकत घेतलेली दारू पिणे भाग पडू नये म्हणूनच कदाचित परमिटरूमचे भरमसाठ परवाने गेल्या ४० वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले असावेत अर्थात जशी वाईन शॉपमधून दारू विक्री खरेदी करण्यासाठी परवाना आवश्यक आहे तसाच तो परमिटरूम मध्ये बसून दारू खरेदी करत पिण्यासाठीही.मात्र या […]











