भूवैकुंठ समजल्या जणाऱ्या पंढरपूरला जशी भक्तीची परंपरा आहे तसाच संघटीत गुंडगीरी आणि अवैध व्यवसायिकांच्या दहशतीचाही डाग आहे.आपले अवैध धंदे सुरळीत सुरु रहावेत म्हणून राजकीय वस्त्राची झूल पांघरत प्रतिष्ठा प्राप्त करणाऱ्यांची जशी इथे कमी नाही तशीच एखादा अतिशय कर्तव्यकठोर अधिकारी जर या शहरास लाभला तर त्याला देवत्व बहाल करण्यातही येथील जनतेने कधी कसूर ठेवली नाही.तात्कालीन पोलीस […]
गुन्हे विश्व
11 वर्षांची पोटची पोर अपशकुनी असल्याची अंधश्रद्धा
जळगाव : अल्पवयीन मुलगी अपशकुनी असल्याच्या अंधश्रद्धेतून आई वडिलांनी केलेल्या छळाने तिचा जीव घेतला. जळगाव शहरात पिंपळा शिवारामध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा तिचे आई-वडील जन्मापासून अनन्वित छळ करत होते. या निर्दयी आई-वडिलांनी मुलीला अन्न-पाणी दिले नाही, तिला आंघोळ न करु दिल्याने तिला शारीरिक व्याधीही जडल्या. अखेर या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मन हेलावून टाकणारी ही घटना जळगाव […]
कोरोना काळात अधिकाऱ्यांची ओली पार्टी; ग्रामस्थांकडून व्हिडीओ चित्रण
लातूर : एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कडक करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चाकूर नगरपंचायत येथील पाणी पुरवठा आणि स्वछता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची कोरोनाचे नियम मोडून सुरु असलेली मटन आणि दारु पार्टी गावकऱ्यांनी उघडकीस आणली आहे. या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, […]
धक्कादायक! प्रेयसीच्या मदतीने पतीने 7 वर्षांच्या मुलासह पत्नीला दिला गळफास
दौंड, 28 एप्रिल: प्रेमात अडथळा येत असल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि 7 वर्षांच्या मुलांची हत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती सचिन सोनवणेला पोलिसांनी अटक केली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील स्वराज सोसायटीमध्ये 7 वर्षाच्या मुलासह आईचा गळफास घेतल्याच्या अवस्थेतील मृतदेहाचा उलगडा अवघ्या काही तासात यवत […]
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!
अकोला ः येथील प्रसिद्ध विजय ट्रान्सपोर्टच्या मालकाला गृहमंत्र्यांच्या नावाने दहा लाखांचा हप्ता मागितल्याची तक्रार पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते १३ जणांकडे करण्यात आली आहे. यात हप्तासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देवून आठ तास स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप ट्रान्सपोर्ट संचालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध केला आहे. अकोला येथील वाशीम बायपास रोडवरील गंगानगर येथे विजय ट्रान्सपोर्टचे […]
डॉक्टरी पेशाला काळीमा, कोविड सेंटरमध्ये शरीरसुखाची मागणी करणारा डॉक्टर गजाआड
नागपूर, 28 एप्रिल : कोरोनाच्या संकटात डॉक्टर जिवाची बाजी लावून रुग्णांची सेवा करत आहे. पण नागपुरात डॉक्टरीपेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कोविड सेंटरमध्ये एका डॉक्टराने सहकारी महिला डॉक्टरावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. डॉ. नंदू रहांगडाले असं या डॉक्टराचं […]
मोक्क्यातील आरोपी दीप्ती काळेची पुण्यात आत्महत्या
दीप्ती काळे या महिलेने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या 8व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. दीप्ती काळे ही महिला मोक्क्याच्या गुन्ह्यातील आरोपी होती. तिच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. दीप्ती काळे हिच्यावर पुण्यातील नामवंत सराफासह अनेक नागरिकांना ब्लॅकमेल केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच खंडणीचाही तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीप्ती काळेवर […]
पंढरपूरात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
वाळू प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीची पोलीस कोठडी वाढविण्यात येऊ नये यासाठी अटकेतील आरोपी च्या भावाकडे विशाल काटे नामक इसमाने माझे पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत, तुमच्या भावास पोलीस कोठडी वाढवून मागणार नाही असे सांगत चार लाखाची लाचेची मागणी करणाऱ्या व त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दोन लाख पैकी 70 हजार रुपये स्वीकारून स्विफ्ट गाडीतून पळ काढणाऱ्या विशाल […]
कोरोनामुळे भाजप नगरसेविकेच्या भावाचे निधन, बहिणीने हॉस्पिटलमध्ये केली तोडफोड!
नाशिक, 27 एप्रिल : नाशिकमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्यसह राजकीय लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. नाशिकमध्ये सर्वात तरुण नगरसेविका ओळख असलेल्या प्रियंका घाटे यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियंका घाटे आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये राडा घातला. भाजप नगरसेविका प्रियंका घाटे यांचा भाऊ रोशन घाटे याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे […]
खळबळजनक! प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या भावाची हत्या केल्याचा आरोप, प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक
हुबळी, 27 एप्रिल: प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हिला हुबळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या भावाच्या खून प्रकरणातील आरोपाखाली या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. 32 वर्षीय राकेश काटवेच्या खून प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. मीडिया अहवालानुसार राकेशचं डोकं धडावेगळं करण्यात आलं होतं, देवरगुडीहल वनक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत त्याचं डोकं आढळलं तर शरीराचा इतर […]











