वाळू प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीची पोलीस कोठडी वाढविण्यात येऊ नये यासाठी अटकेतील आरोपी च्या भावाकडे विशाल काटे नामक इसमाने माझे पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत, तुमच्या भावास पोलीस कोठडी वाढवून मागणार नाही असे सांगत चार लाखाची लाचेची मागणी करणाऱ्या व त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दोन लाख पैकी 70 हजार रुपये स्वीकारून स्विफ्ट गाडीतून पळ काढणाऱ्या विशाल काटे नमक आरोपी विरोधात व त्याच्या साथीदारांनी विरोधात लाचलुचपत विभागाने कारवाई केली असून याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत काल अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिपर वर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी फिर्यादीचा भाऊ अमर पाटील यांच्यासह काही आरोपी अटकेत होते व त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. पोलीस कोठडी वाढवून मागू नये यासाठी मध्यस्थामार्फत चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई नंतर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार विशाल काटे व त्याचे साथीदार हे 70 हजार रुपये स्वीकारल्यानंतर एम एच 13 d e ४२८० या स्विफ्ट गाडीतून पळून गेले.
सदर कारवाई ही राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव पाटील पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर , निरीक्षक कविता मुसळे, कॉन्स्टेबल सोनवणे, पोलीस नाईक अर्चना स्वामी, पोलीस नाईक पकाले, पोलीस कॉन्स्टेबल जानराव, चालक सुरवसे नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्या पथकाने केली असून याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विशाल काटे व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
