ताज्याघडामोडी

शिवसेना धक्कातंत्राच्या तयारीत, कोल्हापूरच्या कट्टर शिवसैनिकाचं नाव चर्चेत

शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना दिलेला अल्टीमेटम संपला असून आता शिवसेना नेत्यांनी त्यांची पुढची रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्यानुसार पक्षातील कट्टर शिवसैनिक पदाधिकाऱ्यालाच राज्यसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात निर्णय झाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरुरचे माजी खासदार आढळराव पाटील, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तसंच चौथं आश्चर्यकारक नाव म्हणजे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीकडून सासूची हत्या

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपली बायको नांदायला येत नाही म्हणून त्याने सासुच्या पोटात कात्री खुपसून तिची हत्या केली. तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीवरही विळ्याने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुक याठिकाणी घडली आहे. या घटनेत सासूचा जागीच मृत्यू […]

ताज्याघडामोडी

प्रेमाची फूस लावून अल्पवयीन विद्यार्थीनीला पळविणारा शिक्षक गजाआड

अल्पवयीन विद्यार्थीनी 1 मे रोजी सकाळच्या सुमारास घरासमोर कपडे वाळत घातलताना बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी शोध घेऊनही ती सापडली नाही. शेवटी तीच्या वडिलांनी २ मे रोजी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाली असून अज्ञात व्यक्तीने तीचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता पीडित मुलगी बेपत्ता झाली. त्याच […]

ताज्याघडामोडी

इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक, 23 वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू

इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी चार्जिंगला लावत असताना शॉक लागून युवतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये घडली आहे. कराड तालुक्यातील म्होप्रे येथे शुक्रवार (20 मे) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. शिवानी अनिल पाटील (वय 23, रा. म्होप्रे, ता. कराड) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत […]

ताज्याघडामोडी

देशभरात पेट्रोल 9.5 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त, केंद्र सरकारची घोषणा

केंद्र सरकारने अबकारी कर (एक्साईज ड्यूटी) कमी केल्याने देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे. पेट्रोलवरचा अबकारी कर 8 रुपये तर डिझेलवरचा अबकारी कर 6 रुपयांनी कमी करत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. यामुळे पेट्रोलच्या दरात 9.5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची घट होईल, असं सीतारमण यांनी सांगितलं. याव्यतिरिक्त निर्मला सीतारमण यांनी आणखी काही […]

ताज्याघडामोडी

ओटीपीशिवाय एटीएममधून पैसे मिळणार नाहीत, एसबीआयचा नवा नियम

देशात ऑनलाईन तसेच एटीएमच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी ओटीपीशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत, असा नियम लागू केला आहे. एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी बंधनकारक करण्यात आला आहे. 10 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी हा नियम लागू […]

ताज्याघडामोडी

लाल महालातील लावणीच्या व्हिडीओवरुन वाद; संभाजी ब्रिगेडचा तीव्र आक्षेप, जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत विरोध

पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं तोडली, त्याच लाल महालात लावणीची शुटिंग झाली, आणि बघता बघता याचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला, यावर आता राजकीय, सामाजिक आणि सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर संभाजी ब्रिगेडने मात्र तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे, दरम्यान, राज्याचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेमात अडसर ठरणाऱ्या बायकोनं काढला नवऱ्याचा काटा

आयुष्यभर साथ देण्याचं वचन घेणाऱ्या पत्नीनेच आपल्या पतीला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नापूर्वी प्रियकरासोबत असलेल्या संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढला.  आयुष्यभर साथ निभावण्याचं वचन घेणाऱ्या पत्नीनंच पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केली. ही खळबळजनक घटना मालेगावच्या टाकळी गावात समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येचा छडा लावून […]

ताज्याघडामोडी

भावाने मोबाईलमधून सिमकार्ड काढल्याच्या वादातून बहिणीची आत्महत्या

लहान बहिण घरातील काम सोडून सतत मोबाईल बघत असल्याने मोठ्या भावाने बहिणीच्या मोबाईलमधून सीमकार्ड काढल्याच्या वादातून बहिणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरात घडली. किरण शिवदास साहनी (१८) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.  मृत किरण […]

ताज्याघडामोडी

शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मागील काही महिन्यांपासून ते ब्राह्मणविरोधी असल्याची टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ बहुतेक ब्राह्मण मान्यवरांनी पवार ब्राह्मणविरोधी असल्याची टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आलंय. शरद पवार ब्राह्मणविरोधी असल्याची मतं सोशल मीडियावर व्यक्त केली जातात. याच पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका […]