ताज्याघडामोडी

शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मागील काही महिन्यांपासून ते ब्राह्मणविरोधी असल्याची टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ बहुतेक ब्राह्मण मान्यवरांनी पवार ब्राह्मणविरोधी असल्याची टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आलंय. शरद पवार ब्राह्मणविरोधी असल्याची मतं सोशल मीडियावर व्यक्त केली जातात. याच पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका आणि ब्राह्मण संघटनांचं म्हणणं यावर सखोल चर्चा होईल. या बैठकीला ब्राह्मण महासंघ वगळता इतर संघटना पवारांसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहेत. तसा निरोप त्यांनी शरद पवार यांना कळविला आहे.

गेले काही महिने ज्येष्ठ नेते शरद पवार हे जातीयवादी, ब्राह्मणविरोधी असल्याची टीका सोशल मीडियातून होऊ लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर जाहीर सभांमधून शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण होते म्हणून त्यांच्या उतारवयात त्यांना राष्ट्रवादीने त्रास दिला, असा गंभीर आरोप केला. त्यांच्या गंभीर विधानानंतर हळूहळू बाकीच्याही मान्यवरांनी पवारांवर ब्राह्मणविरोधी असल्याचा शिक्का मारला. ज्येष्ठ सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांनीही पवार ब्राह्मणांच्याविरोधात असल्याची टीका केली तसेच जातीभेद मिटवण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यायला हवा, असं ते म्हणाले. गेल्या अनेक महिन्यांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *