करुणा मुंडे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. त्याच्या विरोधात अहमदनगर पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर येथील एका कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात स्वतंत्र राजकीय पक्ष काढला आहे. त्या राजकीय क्षेत्रात हात पाय मारत असतानाच वादाच्या […]
ताज्याघडामोडी
विजेच्या तारेला चिकटून दोन चिमुकल्यांसह आई जागीच ठार
एक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली आहे. गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथे विजेच्या तारेला चिटकून आईसह दोन लेकरांचा मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना घडली. राठोड वस्तीतील शेत शिवारात दोन लहान मुले शेतात खेळत असताना शेतात पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागला. त्यात दोन मुले खाली पडली.त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या आईला देखील शॉक लागल्याने या घटनेत तिघाचा दुदैर्वी […]
सिंहगड’ पंढरपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात ‘प्लॅनिंग अँड डिझाईन ऑफ बिल्डिंग्स युजींग रेवीट’ या विषयावर साप्ताहिक कार्यशाळा संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागमध्ये तृतीय वर्ष मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘प्लॅनिंग अँड डिझाईन ऑफ बिल्डिंग्स युजींग रेवीट’ या विषयावर आधुनिक पध्दतीचे रेवीट हे सॉफ्टवेअर वापरुन स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे प्रारूप त्रिमितीय (3D) आराखडे तयार करण्याविषयीची आणि सध्याच्या बदलत्या काळानुसार “बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (BIM)”, या संकल्पनेला […]
पत्नीला सोडून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव; शेजारील महिलेच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या
औरंगाबादेतील पैठण तालुक्यातील लोहगाव येथील तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.गणेश सुभाष मुसळे (रा. लोहगाव ता.पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. गावात राहत असलेल्या एका महिलेने काही महिन्यापासून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवून लग्न कर आणि तुझ्या पत्नीला सोडून माझ्यासोबत संसार कर म्हणून खुप दिवसांपासून तगादा लावला होता. तसेच शेजारी घर असल्याने प्रत्यक्षात […]
चून चून के, गिन गीन के मारे जायेंगे राड्यानंतर बंडखोर आमदार गायकवाड यांची पुन्हा धमकी
ठाकरे गटातील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर ” चून चून के गिण गीण के मारे जायंगे, म्हणत शिंदे गटाचे बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा धमकी दिलीय..” तर कालच्या राड्यात कमी झाले कारण त्याठिकाणी पोलीस होते, मात्र पुढच्या वेळेस आणखी जास्त राडा होईल” असा इशारा ही गायकवाड यांनी ठाकरे […]
सरपंचाने घरकुलासाठी मागितले पैसे, एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडले
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता गडचिरोली जिल्ह्यात एका सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओलालवार (वय-46) यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. एका लाभार्थीला घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी 9 हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपात त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक […]
राज्यात परतीच्या पावसाचा जोरदार दणका बसणार ‘या’ जिल्ह्यात अलर्ट
मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील औरंगाबाद सोडून सर्व जिल्ह्यांत तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त (109 टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे; मात्र त्याचवेळी सप्टेंबरमध्ये कमाल तापमान अधिक असेल असा अंदाज आहे. सप्टेंबरच्या सुरूवातीपासूनच ऑक्टोबर हीटचा त्रास जाणवण्यास […]
खंडणीसाठी खास मैत्रिणीनेच केले मुख्याध्यापकाचे अपहरण
नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मुख्याध्यापकाचे अपहरण त्यांच्याच एका मैत्रिणीने केले. काही सहकाऱ्यांच्या मदतीने खंडणीसाठी अपहरण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत सूचना मिळताचं पोलिसांनी वायुवेगाने तपासाची सूत्र हलवली. त्यामुळे काही तासातचं अपहरण झालेल्या मुख्याध्यापकाची सुखरूप सुटका झाली. कथित मैत्रिणीसह तिचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणातील फिर्यादी प्रदीप मोतीरामानी हे महात्मा […]
कल्याणराव काळे यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त् सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर मोफत सर्वरोगनिदान व औषधोपचार शिबिर संपन्न्
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण वसंतराव काळे यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त् वसंतदादा मेडिकल फौंडेशन संचलित जनकल्याण हॉस्पीटल, पंढरपूर व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संयुक्त् विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबिरआयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांचे शुभहस्ते व वसंतदादा मेडिकल फौडेशनचे […]
पतीसोबत मोबाईलवरून वाद, दोन्ही मुलांना दुधातून विष पाजून संपवलं; स्वतःही विष घेत आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावात एका धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत मोबाईलवरून झालेल्या वादातून महिलेने रागाच्या भरात स्वतःच्या दोन मुलांना दुधातून विष देत स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर महिलेची प्रकृती गंभीर असून, रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेने सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली असून, सिल्लोड ग्रामीण पोलिस […]











