गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खंडणीसाठी खास मैत्रिणीनेच केले मुख्याध्यापकाचे अपहरण

नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मुख्याध्यापकाचे अपहरण त्यांच्याच एका मैत्रिणीने केले. काही सहकाऱ्यांच्या मदतीने खंडणीसाठी अपहरण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत सूचना मिळताचं पोलिसांनी वायुवेगाने तपासाची सूत्र हलवली. त्यामुळे काही तासातचं अपहरण झालेल्या मुख्याध्यापकाची सुखरूप सुटका झाली. कथित मैत्रिणीसह तिचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत.

या प्रकरणातील फिर्यादी प्रदीप मोतीरामानी हे महात्मा गांधी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवार संध्याकाळी ते काही कामानिमित्ताने घराबाहेर पडले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतलेचं नाही. शुक्रवारी रात्री जेव्हा त्यांच्या मुलीने वडिलांच्या फोनवर संपर्क साधला, तेव्हा अपहरणकर्त्यानी प्रदीप यांच्या सुटकेसाठी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर मोतीरामानी कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच रात्रीपासून पोलीस पथक प्रदीप यांचे शोध घेत होते. मात्र, काल संध्याकाळी ते सुखरूप घरी परतले आहेत. 

मुख्याध्यापक प्रदीप मोतीरामानीचे अपहरण त्यांच्याच खास असलेल्या एका मैत्रिणीने खंडणी वसुलीसाठी केले होते, हे तपासात पुढे आले आहे. नोएल फ्रान्सिस असे आरोपी महिलेचे नावं आहे. तिने दोघांना काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना आपल्या कटात सहभागी करून घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *