मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील औरंगाबाद सोडून सर्व जिल्ह्यांत तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त (109 टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे; मात्र त्याचवेळी सप्टेंबरमध्ये कमाल तापमान अधिक असेल असा अंदाज आहे. सप्टेंबरच्या सुरूवातीपासूनच ऑक्टोबर हीटचा त्रास जाणवण्यास सुरू झाले आहे.
दिवसाचे तापमान म्हणून अधिक आर्द्रतेमुळे दिवसाचे वातावरण जाचक ठरण्याची शक्यता आहे. संपूर्ण खान्देश, अहमदनगर, सांगली, नागपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे व दक्षिण नाशिक व उत्तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, नांदगाव, येवला, वैजापूर ते सिल्लोडपर्यंतच्या तालुक्यांतही सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्यात पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण (१०९ महाराष्ट्रात दुपारचे ३ वाजेपर्यंत कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता ८० टक्के आहे. थोडक्यात सप्टेंबर महिन्यात कमाल तापमान अधिक असणार आहे. शिवाय, पहाटे ५ पर्यंत किमान तापमान हे सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक भागात गेल्या आठवडाभरापासून सौम्य हवामानाचा परिणाम दिसून येत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. 04 सप्टेंबर 2022 दरम्यान काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या काही भागात हलका ते मध्यम हवामान असेल या कालावधीत पावसाची तीव्रता. आर्थिक राजधानी मुंबईसह कोकणाला सर्वात कमी फटका बसणार आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या दोन दिवसापासून काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. नाशिकमध्ये पावसाने धिंगाणा घातला आहे. सिन्नर शहरासह परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. दातली येथील देव नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तीन गावांचा यामुळे संपर्क तुटला आहे. अजूनही रात्री संततधार पाऊस चालू असल्याने नद्या, नाल्या ,ओढ्याना पूर आल्याचे परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच सोलापुरातल्या बार्शी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूर आल्याची स्थिती सध्या दिसते. मागील तीन ते चार दिवसांपासून तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागते. आणि त्याचाच परिणाम म्हणजे गावोगावच्या नद्या ह्या ओसंडून वाहताना दिसत आहेत.