acb ने महिला सरपंचास पतीसह घेतले ताब्यात विविध कामांचे बिल मंजूर करण्यासाठी शिरजगाव बंडच्या सरपंच व सरपंचाच्या पतीने ३० हजार रुपये लाच मागितल्या प्रकरणी ‘एसीबी’ने गुरुवारी (दि. ८) सरपंच महिलेच्या पतीला कंत्राटदाराकडून लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. तसेच सरपंच महिलेला सुद्धा ताब्यात घेतले आहे. शिल्पा धीरज इंगळे (३९) आणि धीरज रामरावजी इंगळे […]
ताज्याघडामोडी
शेतकऱ्याने जप्त केली पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची
देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी अरमाळ धरणासाठी गावातील भास्कर वालू राठोड यांची शेत जमीन १९९४ मध्ये संपादित करण्यात आली. मात्र त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. उत्पन्नाचे साधन असलेली एकमेव जमीन धरणाकरिता अधिग्रहित करण्यात आली. मात्र त्यांचा योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने न्याय मागत २००८ साली दिवाणी न्यायालयात धाव घेतली. अनेक वर्षांपासून शेतकऱ्याने प्रशासन विरोधात न्यायालय लढाई […]
उद्धव ठाकरेंनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप
मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती गुरुवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. ठाकरे कुटुंबीयांविरोधात सीबीआय व ईडीमार्फत तपास करण्याचा आदेश द्यावा, अशा विनंतीच्या गौरी भिडे यांनी फौजदारी जनहित याचिका केली आहे. ‘ही याचिका […]
राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार! राज्यात पुन्हा पाऊसाची शक्यता
पुणे हवामान विभागाने नुकताच एक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. राज्यात कधीही 15 डिसेंबर पर्यन्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पाऊस पडणार असल्याचे चित्र निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसाठी हे धोकेदायक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नुकसानीला तोंड देण्याची वेळ येते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेमोसमी पाऊसाने […]
दि.९ व १० डिसेंबर रोजी स्वेरीत आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ चे आयोजन
स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांची पत्रकार परिषदेत माहिती पंढरपूर- ‘राज्यात तंत्रशिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना आणि व्यावसायिक शिक्षणातील स्वतंत्र ‘पंढरपूर पॅटर्न’ अमलात आणत असताना येत्या दि.९ व दि.१० डिसेंबर,२०२२ या दोन दिवशी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये चौथी आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ चे आयोजन करण्यात आले असून याची पूर्ण तयारी झाली […]
प्रेमसंबंध तोडल्याने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित
प्रेमसंबंध तोडल्यानंतर प्रियकराकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे पोलिसांकडे तक्रार दिल्याने प्रियकराने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित केल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी शिरुरमधील एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी देवेंद्र धरमचंद फुलफगर (रा. शिरुर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि […]
पतीवर सलग 7 महिने विषप्रयोग आणि त्यानंतर…
मुंबईत रहाणाऱ्या एका व्यावसायिकाची अचानक तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याच्या शरीरातील काही अवयव अचानक थांबले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला त्या व्यावसायिकाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचं त्याच्या कुटुंबियांना वाटत होतं. पण हे प्रकरण तितकंस साधंसरळ नव्हतं. यामागे एक भयानक कटकारस्थान रचलं गेलं होतं. त्या व्यावसायिकाचा मृत्यू नाही तर हत्या करण्यात आली […]
विद्यार्थिनीला स्टोअर रूममध्ये टाचणी आणण्यासाठी पाठवले
पाठीमागून जात शिक्षकाने केला विनयभंग अमरावती जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. अशातच एका शिक्षकाने विद्यार्थिनीला स्टोअर रूममध्ये टाचणी आणण्यासाठी पाठवले आणि एकांताचा फायदा घेत त्या मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या शिक्षकाला न्यायालयासमोर हजर केल्याची माहिती समोर आली आहे. तेरा वर्षीय विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन केल्याच्या […]
जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचा आदेश
शेतकरी जिद्दीला पेटला,कोर्टात घेतली होती धाव गेली सात वर्षे अधिग्रहीत जमिनीचा मोबदला देण्यात शासन अपयशी ठरल्यानं शेतकऱ्यानं कोर्टात धाव घेतली होती. याआधीही अशाच पद्धतीने कोर्ट आदेशाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्याची जप्ती करण्याबाबत आदेश निघाला होता. मात्र न्यायालयाला भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने ही जप्ती टळली होती. सुमारे नऊ लाखावर रक्कम द्या अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीसह अन्य साहित्याची […]
देशातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
तब्बल १४०० मुली,महिलांचा वापर,१८ आरोपी ताब्यात महिला आणि मुलींची तस्करी करणाऱ्या तसेच त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलणाऱ्या मोठ्या रॅकेटचा हैदराबात पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मागील काही वर्षांत तब्बल १४०० मुली, महिलांना देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात सायबराबाद आणि हैदराबादच्या […]











