ताज्याघडामोडी

देशातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

तब्बल १४०० मुली,महिलांचा वापर,१८ आरोपी ताब्यात 

महिला आणि मुलींची तस्करी करणाऱ्या तसेच त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलणाऱ्या मोठ्या रॅकेटचा हैदराबात पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मागील काही वर्षांत तब्बल १४०० मुली, महिलांना देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात सायबराबाद आणि हैदराबादच्या हद्दीत ३९ वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

हैदरबाद पोलिसांनी १८ आरोपींना वेगवेगळ्या राज्यांतून अटक केली आहे. आरोपींनी आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, दिल्ली, मुंबई, कोलकाता, आसाम या राज्यांसह बांगलादेश, नेपाळ, थायलंड, उझबेकिस्तान, रशिया या देशांमधूनही मुली, महिलांची तस्करी केली आहे. आरोपी महिलांची वेबसाईटच्या माध्यमातून जाहिरात करायचे. तसेच कॉल सेंटर, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ते ग्राहकांशी संपर्क साधायचे. हैदराबाद आणि सायबराबाद या भागातील तस्करीच्या जवळपास ७० टक्के गुन्ह्यांत अटक करण्यात आलेले आरोपी सामील आहेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. महिलांना देहविक्री व्यवसायात ढकलण्यासाठी आरोपी दिल्ली, बंगळुरू, हैदरबाद येथून एक कॉल सेंटरही चालवायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींनी आतापर्यंत १४१९० महिला आणि तरुणींची तस्करी करून त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलले आहे. त्यासाठी महिलांना आलिशान जीवनशैली, सहज मिळणारे पैसे, नोकरी यांचे आमिष दाखवले जायचे. पोलीस या प्रकरणात अटक केलेल्या १८ आरोपींची चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *