ताज्याघडामोडी

बिल मंजूर करण्यासाठी मागितली ३० हजारांची लाच

acb ने महिला सरपंचास पतीसह घेतले ताब्यात 

विविध कामांचे बिल मंजूर करण्यासाठी शिरजगाव बंडच्या सरपंच व सरपंचाच्या पतीने ३० हजार रुपये लाच मागितल्या प्रकरणी ‘एसीबी’ने गुरुवारी (दि. ८) सरपंच महिलेच्या पतीला कंत्राटदाराकडून लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. तसेच सरपंच महिलेला सुद्धा ताब्यात घेतले आहे. 
       शिल्पा धीरज इंगळे (३९) आणि धीरज रामरावजी इंगळे (४३, दोघेही रा. शिरजगाव बंड ता. चांदूर बाजार) असे ‘एसीबी’ने ताब्यात घेतलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. शिरजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये केलेल्या विविध कामांचे देयक काढण्यासाठी सरपंच व त्यांच्या पतीने ३० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार कंत्राटदाराने १८ नोव्हेंबर २०२२ ला एसीबीकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने २० नोव्हेंबर व नंतर ७ डिसेंबरला पडताळणी केली. त्यावेळी सरपंच शिल्पा इंगळे व पती धीरज इंगळे यांनी ३० हजार रुपयांची मागणी करुन ती रक्कम स्विकारण्याबाबत तयारी दर्शवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *