ताज्याघडामोडी

दि.९ व १० डिसेंबर रोजी स्वेरीत आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ चे आयोजन

स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांची पत्रकार परिषदेत माहिती

पंढरपूर- राज्यात तंत्रशिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना आणि व्यावसायिक शिक्षणातील स्वतंत्र पंढरपूर पॅटर्न’ अमलात आणत असताना येत्या दि.९ व दि.१० डिसेंबर,२०२२ या दोन दिवशी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटपंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये चौथी आंतरराष्ट्रीय परिषद टेक्नो-सोसायटल २०२२’ चे आयोजन करण्यात आले असून याची पूर्ण तयारी झाली आहे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले.

           ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ ही स्वेरीमध्ये होणारी चौथी आंतरराष्ट्रीय परिषद असून शुक्रवारदि.९ व शनिवारदि.१० डिसेंबर या दोन दिवशी ही परिषद होणार आहे. यानिमित्ताने स्वेरीत आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे हे माहिती देत होते. समाजाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर’ हा या परिषदेचा मुख्य गाभा असणार आहे. या परिषदेमध्ये पाणीउर्जादळणवळणहौसिंग आणि निर्जंतुकीकरण यासाठी आधुनिक तंत्रज्ञानमेकॅट्रोनिक्समायक्रो-नॅनो टेक्नॉलॉजीसमाजोपयोगी तंत्रज्ञानरासायनिक आणि भौतिक प्रक्रियाग्रामीण आणि शेती संबंधित व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी असणारे तंत्रज्ञानवापरायोग्य परिसर व आरोग्यासंबंधी चे तंत्रज्ञानदीर्घकाळ टिकणाऱ्या तंत्रज्ञानासंबंधी सर्वंकष दृष्टीकोनमाहिती व तंत्रज्ञानावर आधारित समाजोपयोगी तंत्रज्ञानप्रयोगशाळा पातळीवरील आधुनिक समाजोपयोगी  तंत्रज्ञानसेन्सरप्रतिमा आणि डेटावर आधारित समाजोपयोगी  तंत्रज्ञानग्रामीण आणि शेती संदर्भातील रोजगार निर्मिती साठीचे तंत्रज्ञानसमाजोपयोगी उत्पादन आणि नवनिर्मिती प्रक्रियाग्रामीण आणि अभियांत्रिकी विकासग्रामीण भारतासमोरील आव्हाने या मुद्द्यांवर अधिक भर असणार आहे. यापूर्वी सन २०१६२०१८ व २०२० या तीन वर्षी टेक्नो-सोसायटल‘ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून स्वेरीमध्ये समाजाशी निगडित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील तंत्रज्ञानाला चालना मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिसंवाद आयोजित केले होते. तिसरी आंतराष्ट्रीय परिषद ही जागतिक कोरोना महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने झाली. आता होणाऱ्या चौथ्या टेक्नो-सोसायटल २०२२’ परिषदेसाठी आयआयटी दिल्लीचे माजी संचालक व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. रघुनाथ शेवगावकर हे प्रमुख उदघाटक म्हणून लाभलेले  आहेत. या परिषदेत कि नोट स्पीकर’ म्हणून परदेशातून अगुस बुधीयोनो (इंडोनेशिया)प्रा.अशोक रानडे (कॅनडा)डॉ. धनंजय तांबे (अमेरिका)बोतीर उस्मानोव्ह (उझबेकिस्तान)प्रा.अमित सिन्हा (अमेरिका)प्रा.अजय मिश्रा (दक्षिण आफ्रिका)प्रा.तीर्थंकर बॅनर्जी (ऑस्ट्रेलिया)डॉ. नेहा बियाणी (अमेरिका)डॉ. डॉली पारीख (अमेरिका)डॉ. वेंकट रेड्डी (दुबई) तर भारतातील विविध राज्यातून जे एम. चंद्रकिशनडॉ. विजय आठवलेराजाराम देसाईडॉ. आय. थिरूनऊक्करसूडॉ. गौरव बरतारयाडॉ. विजयकुमार पालडॉ.कॅशफुल्ल ओराडॉ. श्रीदेवी वाकुलाबरनमडॉ. दिलीप वाकुलाबरनमडॉ. एन.बी.पासलकरडॉ. पद्माकर केळकरडॉ. आर बालसुब्रमण्यमडॉ. व्ही.के. सुरीडॉ. प्रताप सानपडॉ. संजय तोष्णीवालश्रीनिवास चामर्थ्यस्वेरीचे डॉ. बी.पी. रोंगे यांच्यासह तज्ञ संशोधक व अभ्यासक सहभागी होणार आहेत. टेक्नो- सोसायटल २०२२’ चे मुख्य समन्वयक स्वेरीचे  शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी परिषदेविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, ‘कोणत्याही कार्यक्रमाचा लाभ हा समाजाला कशा पद्धतीने होईल हे पहात असताना टेक्नो- सोसायटल’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा फायदा समाजाच्या उद्धारासाठी करायचा यासाठी टेक्नो- सोसायटल’ या परिषदेची सुरुवात झाली. यंदा होणाऱ्या परिषदेसाठी जवळपास ३०० प्राध्यापक व संशोधकांनी नोंदणी केली असून १२७ संस्थांमधून व ५१ महाविद्यालयांमधून जवळपास ३५० संशोधनपर लेख प्राप्त झाले आहेत. सर्व संशोधनपर लेख हे स्प्रींजर या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जाणार आहेत. टेक्नो- सोसायटल २०१६’ व टेक्नो-सोसायटल २०१८’  साली स्प्रींजर या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या प्रोसीडींगचे प्रत्येकी १ लाख वाचकांनी डाऊनलोड करून वाचन केले आहे तर २०२०  साली झालेल्या टेक्नो- सोसायटल‘ या तिसऱ्या परिषदेचे प्रोसीडींग डाऊनलोड करून ५० हजार वाचकांनी वाचन केले आहे.’ सचिव डॉ. रोंगे पुढे बोलताना म्हणाले की, ‘गेल्या महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन (आर.जी.एस.टी.सी.) कडून ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित बहु-संस्थात्मक संशोधन प्रस्तावास सुमारे ३४ कोटी रुपयांचा संशोधन निधी मंजुर करण्यात आला असून या संशोधन प्रस्तावात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मुंबईवीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूटमुंबई व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगपंढरपूर या तीन संस्थांचा समावेश आहे तसेच या संशोधन प्रकल्पामध्ये प्रमुख संशोधकांपैकी एक म्हणून स्वेरीचे  शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार हे आहेत. २०२२ मध्ये केंद्र शासनाच्या निती आयोगाकडून अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी)’ च्या महाविद्यालयातील स्थापनेसाठी रु.५ कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. मुंबई जवळील तारापूर विभागातील ग्रामस्थांना बी.ए.आर.सी. च्या तंत्रज्ञानाच्या प्रचाराद्वारे सक्षम करण्यासाठी एन.पी.सी.आय.एल.तारापूर कडून सुमारे रु. २ कोटी एवढे अनुदान मंजूर  झाले आहे. स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरींगसिव्हील इंजिनिअरींगकॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरींगइलेक्ट्रोनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरींग या शाखांना ३० जून २०२३ पर्यंत एन.बी.ए. चे मानांकन मिळालेले आहे तसेच महाविद्यालयास देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले नॅक’ अर्थात नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’ चे ३.४६ सीजीपीए सह ए प्लस’ हे मानांकन देखील नुकतेच मिळाले आहे. सदर मानांकन हे पुढील पाच वर्षांपर्यंत लागू असणार आहे. ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी. (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व ३.४६ सीजीपीए सह नॅकचे ए प्लस’ मानांकन मिळविणारे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सोलापूर विद्यापीठातील पहिले व एकमेव महाविद्यालय ठरले आहे. नॅकचे हे मानांकन मिळाल्यामुळे स्वेरीमधील शिक्षणाच्या दर्जावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या पूर्वी महाविद्यालयाला नॅकचे व एनबीए चे दोनदा मानांकन मिळालेले आहे. नॅक’ ही शैक्षणिक संस्थांना मानांकन देणारी देशातील स्वायत्त संस्था असून नॅकचे मानांकन असणाऱ्या शिक्षण संस्थाना एक वेगळी ओळख प्राप्त होत असते. या मानांकनामुळे विद्यार्थीपालकनोकऱ्या देणाऱ्या कंपन्या व इतर समाज घटकांना येथील शिक्षणाच्या उच्च दर्जाबाबत खात्री मिळत असते. या मानांकनामुळे महाविद्यालयाला एक उच्च दर्जाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्यानेमहाविद्यालयास विविध संस्थांकडून अधिक संशोधन निधी मिळण्यास मदत होईल. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून स्वेरी‘ मध्ये ग्रामीण मानव संसाधन विकास केंद्र‘ (आर.एच.आर.डी.एफ.) ची निर्मिती ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते उदघाटन करून करण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून पुढे समाजोपयोगी आणि ग्रामीण उद्योजकता वाढविण्याच्या हेतूने तसेच उपयोगी तंत्रज्ञान ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या माध्यमातून स्वेरीमध्ये उत्तम दर्जाची व हाय स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वेरीचे नूतन अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘स्वेरीने समाजाची नाळ ओळखून तंत्रशिक्षण देत असताना विविध पातळीवर यश मिळवले आहेयाचेच आपण साक्षीदार आहात. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यासाठी अर्न अँड लर्न’ ही स्कीम राबवणारी स्वेरी ही बहुधा एकमेव खासगी शिक्षणसंस्था असून भविष्यात देखील संस्थेकडून समाजाच्या हिताचे उपक्रम राबवले जातील.’ या पत्रकार परिषदेला संस्थेचे नूतन अध्यक्ष दादासाहेब रोंगेविश्वस्त एच.एम.बागलविश्वस्त बी.डी. रोंगेयुवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे व आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *