लग्नाचे आमिष दाखवून, तू माझी बायको होणार आहेस, असे म्हणत मागील अकरा वर्षापासून एका ३२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्यात आला आहे. महिलेच्या अंगावर डिझेल टाकून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील दहेगाव येथील एका आकड्यावर घडली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दोन आरोपींविरोधात बामणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात […]
ताज्याघडामोडी
पुढल्या जन्मी भेटू! विवाहित प्रियकरानं प्रेयसीला संपवलं, मग टोकाचं पाऊल उचललं
विवाहित प्रियकराने आधी प्रेयसीवर गोळी झाडली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून मृत्यूला कवटाळले. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या दोघांच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या पोलीस याप्रकरणी कारवाई करत आहेत. प्रकरण उत्तर प्रदेशातील हलियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील […]
विजांच्या कडकडाटासह १८ जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार, ६ जिल्ह्यांमध्ये गारपीट
यंदा राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह इतरही भागाला पावसाने झोडपून काढलं आहे. अशातच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरमधील गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]
जुन्या पेन्शनसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारचा दिलासा; संपकाळातील रजेबाबत मोठा निर्णय
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. या संपकाळातील सात दिवसांची रजा ही अर्जित रजा म्हणून गृहीत धरण्यासंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने गुरुवारी जाहीर केला. या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांची वेतनकपात होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणून आणि पूर्व उदाहरण होणार नाही, या अटीवर हा निर्णय […]
हे निरागस हसू पुन्हा दिसणार नाही! जत्रेसाठी गावाकडं निघालेल्या सख्ख्या भावांचा करुण अंत
निमगाव केतकी येथे यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबाचा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत अपघात झाला. कारला झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात मुलांचे आई, वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे निमगाव केतकी (ता. इंदापूर) परिसरात शोककळा पसरली आहे. आर्यन संतोष भोसले (वय १२ वर्षे) आणि आयुष […]
मुलगा होत नाही, सासू म्हणाली भोंदूबाबाशी लगट कर, नवरा म्हणाला मित्राशी संबंध ठेव
लग्नानंतर अनेक महिलांना सासरच्या त्रासाला सामोरे जावे लागते. रंग रूप दिसण्यावरून, लवकर आई होत नाही अशा अनेक गोष्टी ऐकत काही विवाहितांना दिवस काढावे लागतात. अनेक वेळा आपण सासूने सुनेला मानसिक त्रास दिलेला ऐकले आहे. नेरुळ परिसरामध्ये सासू आणि नवऱ्याने हद्द पार केली. एखाद्या स्त्रीला मुलं होत नाही ह्यात तिची एकटीची काय चूक? हे समजून न […]
मी नसताना घरी येतो आणि माझ्याच बायकोसोबत… नवऱ्याच्या मनात संशय, अखेर नको तेच घडलं
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील तरुणाच्या हत्याकांडाचे गूढ उलगडत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने खुनासाठी वापरलेले पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. मित्राला आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असल्याच्या संशयातून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. पाच एप्रिल रोजी पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांचा तपास जसजसा […]
एकाच खोलीत भाऊ-बहिणीने एकत्र आयुष्य संपवलं, पाहणारा प्रत्येकजण सुन्न, कारण…
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात सख्ख्या भाऊ-बहिणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रकरण शाहगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिधाई भागातील आहे. येथे २७ वर्षीय राज कपूर आपल्या २० वर्षांच्या बहिणीसोबत राहत होता. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचेही मृतदेह एकाच खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती […]
राज्यावर ५ दिवस अवकाळी संकट, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात अवकाळी पावसाने आधीच थैमान घातलं असताना आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ५ दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाट/विजांच्या कडकडाटासह हलका / मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १२ ते […]
एक प्रियकर एक पती आणि ३ जणांना दिली हत्येची सुपारी; पत्नीने सोडल्या सगळ्याच मर्यादा
गाझियाबाद पोलिसांकडून दोन दिवसांआधीच एका तरुणाच्या हत्येचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये आता पोलिसांनी आणखी एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. संबंधित मृत तरुणाची हत्या ही दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्याच्या पत्नीनेच केली होती. आरोपी पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत अवैध संबंध होते. ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. पण तिच्या या नव्या नात्यामध्ये पती […]