ताज्याघडामोडी

एक प्रियकर एक पती आणि ३ जणांना दिली हत्येची सुपारी; पत्नीने सोडल्या सगळ्याच मर्यादा

 गाझियाबाद पोलिसांकडून दोन दिवसांआधीच एका तरुणाच्या हत्येचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये आता पोलिसांनी आणखी एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. संबंधित मृत तरुणाची हत्या ही दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्याच्या पत्नीनेच केली होती. आरोपी पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत अवैध संबंध होते. ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. पण तिच्या या नव्या नात्यामध्ये पती अडचण ठरत होता. यामुळे महिलेने असा काही प्लान केला की वाचून पोलिसांनाही घाम फुटला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने तिच्या प्रियकरासह ३ जणांना पतीला ठार करण्याची सुपारी दिली होती. तिने भाड्याने गूंड आणले आणि आपल्याच पतीची गळा आवळून हत्या केली. इतकंच नाहीतर पोलिसांनी दिशाभूल करण्यासाठी तिने मृतदेह २० किमी दूर गाझियाबाद इथं फेकून दिला. यात पत्नीचं काळ कृत्य अद्याप थांबलं नाही तर तिने पतीला ठार करण्याआधीच ‘आज तुझा शेवटचा दिवस’ अशी धमकी दिली होती. या घटनेचा उलगडा करणारे पोलिसही या घटनेमुळे थक्क झाले आहेत.

घटनेचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून सुपारी देऊन बोलवण्यात आले तिघे मात्र अद्याप फरार असल्याची माहिती आहे. तर पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती आहे.मंगळवारी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटवणं कठीण झालं होतं. पण अखेर अनेक प्रयत्नानंतर हापूरच्या पिलखुआ इथं राहणाऱ्या मोईन याचा हा मृतदेह असल्याचं समोर आलं. यानंतर पहिला संशय पत्नीवर रेश्मावर गेला. पोलिसांनी तातडीने तिला ताब्यात घेत विचारपूस सुरू केली असता तिने संपूर्ण घटनेची कबुली दिली आणि तिच्या प्रियकाराचीही माहिती उघड केली. तिने पोलिसांना इतर तिघांची नावंही सांगितली असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *