कोरोनाचा आलेख उतरता असून रुग्णसंख्याही रोडावली आहे. दोन वर्षांपासून धुमाकूळ घालणारा कोरोना आता कुठे आटोक्यात येत असल्याचे दिसताच केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून लागू असणारे कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी आदेश जारी केले आहेत. जनता कर्फ्यू लागू करून आज बरोबर दोन वर्ष झाले आहेत. या काळात रुग्णसंख्या कोट्यवधींचा […]
ताज्याघडामोडी
अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणार – दिलीप वळसे-पाटील
अवैध धंदे बंद करण्याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाकडून माहिती घेऊन या परिसरात अवैध धंद्यांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली. अवैध धंद्यांबद्दल आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, ज्या पोलीसठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु आहेत आणि अशा काही […]
घराबाहेरील रहस्यमय चॉकलेट खाऊन 4 मुलांचा मृत्यू
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याबातमीने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरलं आहे. येथे एकाच घरातील चार मुलांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत येथील मुख्यमंत्री योगी यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेत चॉकलेट खाल्यामुळे या 2 ते 4 वयोगटातील मुलांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. ही घटना […]
कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
बलात्काराचा गुन्हा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलाविरोधात दाखल करण्यात आला आहे. गजा मारणेचा २२ वर्षीय मुलगा प्रथमेश मारणेवर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अडीच वर्षांपासून पीडित तरुणी आणि आरोपी प्रथमेश मारणे एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान आरोपीने तरुणीला २७ ऑगस्ट २०२० ते १७ […]
राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकरांनी दिला राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद रुपाली चाकणकर यांच्याकडे असल्यामुळे राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. रुपाली चाकणकर यांच्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. चाकणकर या […]
“…तर माझी मुलगी आत्महत्या करेल”; जितेंद्र आव्हाड यांचं खळबळजनक वक्तव्य
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली़. या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने टाच आणली असून, ही मालमत्ता ६ कोटी ४५ लाखांची आहे. केंद्रीय संस्थेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये या कारवाईची जोरदार चर्चा असतानाच राज्याचे […]
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना रेड अलर्ट
तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतक-यांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर इथे आज हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सातारा, सांगली जिल्ह्यात उद्या हलक्या सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र […]
फेसबुकच्या माध्यमातून महिलेची बदनामी
खोटे बनावट फेसबुक अकाउंटतयार करून त्यास माध्यमातून महिलेची बदनामी केली जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस ठाणे लातूर ग्रामीणच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल व २ सिमकार्ड जप्त केले आहेत. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी सायबर सेल […]
पंढरपूर-कुरुल या मार्गाच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
विधानभवन मुंबई येथे बैठक संप्पन आ .बबनराव शिंदे यांची माहिती सोलापूर-पंढरपूर मार्गावरील पंढरपूर-देगांव-चिंचोली-टाकळी-सिकंदर-कुरुल ते रामा-202 ला जोडणारा प्रजिमा 66 या 35 किलोमीटर लांबी असलेल्या रस्त्याचे कामासाठी निधी मिळत नसल्याने आ .बबनदादा शिंदे यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना देऊन आपली भूमिका शासनाकडे मांडली. त्यानुसार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधान भवन मुंबई येथे […]
वै.ह.भ.प.वासुदेव महाराज चवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त २३ मार्च पासून पंढरीत भागवत कथा,नामजप व हरिनाम सप्ताहाचे आयोजन
वै.ह.भ.प.वासुदेव महाराज चवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पंढरीत भागवत कथा,नामजप व हरिनाम सप्ताहाचे बुधवार दिनांक २३ मार्च ते ३० मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले असून श्री विठ्ठल रुक्मिणी कृपेने,श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर महाराज,वै. प.पु.हनुमंत बाबा व वै.प.पु.पंढरीनाथ चवरे यांच्या आशीर्वादाने पार पडत असलेल्या या सप्ताह सोहळ्यात कलशपूजन प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते,दीपप्रज्वलन मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या […]











