गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

घराबाहेरील रहस्यमय चॉकलेट खाऊन 4 मुलांचा मृत्यू

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याबातमीने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरलं आहे. येथे एकाच घरातील चार मुलांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत येथील मुख्यमंत्री योगी यांनी शोक व्यक्त केला आहे.

या घटनेत चॉकलेट खाल्यामुळे या 2 ते 4 वयोगटातील मुलांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. ही घटना कसया पोलीस ठाण्याच्या कुडवा उर्फ दिलीपनगर येथील लातूर टोला येथील आहे. असे सांगितले जाते की, कोणीतरी त्यांच्या दरवाजात हे चॉकलेट फेकले होते. ज्यांना खाल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेबद्दल शोक व्यक्त करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित कुटुंबाला तातडीने मदत करण्याचे आणि तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.उपजिल्हाधिकारी वरुण कुमार पांडे यांनी गावकऱ्यांचा हवाला देत सांगितले की, मुखीदेवी सकाळी घराच्या दरवाजात झाडून मारत होत्या.

यावेळी त्यांच्या दरवाज्यात त्यांना पॉलिथिनमध्ये पाच चॉकलेट आणि नऊ रुपये मिळाले. त्यांनी त्यामधील 3 चॉकलेट आपल्या नातवंडांना दिलं आणि एक शेजारच्या मुलाला दिलं. टॉफी खाऊन चारही मुलं खेळायला बाहेर गेली, त्यावेळी ही मुलं चक्कर येऊन जमिनीवर पडली.

यानंतर गावकऱ्यांनी या मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी यांनी मृत घोषीत केलं. या मृत मुलांमध्ये 3 लहान मुलं एकाच घरातील होते. मंजना, स्वीटी आणि समर असे या लहान मुलांची नावं आहेत. तर बाजूला रहाणाऱ्या चौथ्या मुलाचं नाव अरुण आहे.

या चॉकलेटला तपासाठी ठेऊन घेतलं आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की, या चॉकलेटच्या कवरवर बसलेल्या माशांचा देखील मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *