ताज्याघडामोडी

वै.ह.भ.प.वासुदेव महाराज चवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त २३ मार्च पासून पंढरीत भागवत कथा,नामजप व हरिनाम सप्ताहाचे आयोजन

वै.ह.भ.प.वासुदेव महाराज चवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पंढरीत भागवत कथा,नामजप व हरिनाम सप्ताहाचे बुधवार दिनांक २३ मार्च ते ३० मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले असून श्री विठ्ठल रुक्मिणी कृपेने,श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर महाराज,वै. प.पु.हनुमंत बाबा व वै.प.पु.पंढरीनाथ चवरे यांच्या आशीर्वादाने पार पडत असलेल्या या सप्ताह सोहळ्यात कलशपूजन प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते,दीपप्रज्वलन मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या हस्ते,श्रीमद भागवत ग्रंथ पूजा अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या हस्ते,ग्रंथ पूजन हभप मदन महाराज हरिदास यांच्या हस्ते,प्रतिमा पूजन पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते,गाथा पूजन पोलीस निरिक्षक अरुण पवार यांच्या हस्ते,कथा सांगता सपोनि केंद्रे यांच्या उपस्थितीत तर नामजप सांगता माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,लक्ष्मण धनवडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या सप्ताह सोहळ्याचे औचित्य साधत रविवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वारकरी सेवा भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हभप मारुती महाराज कोकाटे यांना वारकरी पुरस्कार तर डॉ.मंदार सोनवणे यांना सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे भूषविणार असून मा.आ.प्रशांत परिचारक,आमदार समाधान आवताडे,हभप भागवत महाराज चवरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्री १००८ महामंडलेश्वर देवबाप्पा महाराज आदी उपस्थित राहणार आहेत.

         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *