प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शाळांमधील शिक्षक आक्रमक झाले होते. जोवर मागण्या मान्य होत नाही तोवर दहावी-बारावीचे पेपर तपासणार नसल्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला होता. त्यामुळे, दहावी-बारावी परीक्षेचा निकाल उशीरा लागणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, दहावी-बारावीचे निकाल वेळेतच लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. विना अनुदानित शिक्षक संघटनेने प्रलंबित […]
ताज्याघडामोडी
ट्रक सोडण्यासाठी 11 हजारांची लाच, पोलीस उपनिरीक्षक रंगेहाथ जाळ्यात
अकरा हजार रुपयांची लाच घेताना नांदेडमध्ये पीएसआयला रंगेहाथ पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याला अटक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख नाजीर हुसेन यांना अटक करण्यात आली. गुन्ह्यात जप्त केलेला ट्रक सोडण्यासाठी त्यांनी अकरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. लाच घेताना पीएसआय हुसेन यांना एसीबीने रंगेहाथ […]
अखेर राज्याची कोरोना निर्बंधातून सुटका; आता मास्क देखील ऐच्छिक!
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे निर्बंध काढले जाणार की नाही? यावरून चर्चा सुरू होती. पण, आता राज्य सरकारने त्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आल्यामुळे महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. याशिवाय, मास्क घालणे हे देखील बंधनकारक नसेल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एबीपीशी बोलताना दिली आहे. गुढी […]
बायको मुलांसह चौघांचा खून करणाऱ्या विनोद गायकवाडला अटक
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येनंतर मोठी खळबळ माजली होती. पोलिसांनी आता या गुह्याची अवघ्या 48 तासांत उकल केल्याचा दावा केला आहे. या खून प्रकरणातील संशयित आरोपी विनोद मराठी उर्फ विनोद गायकवाड याला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याची पुढील चौकशी सुरू आहे. अहमदाबादच्या ओढव परिसरात एक महिला, तिची 15 आणि 17 वर्षांची दोन […]
उद्यापासून कामावर न येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरू करू – अनिल परब
जी मुभा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी दिली होती, ती आज ३१ मार्चपर्यंतची होती. ती मुदत आज संपत असून, आज दिवसाअखेर किती कर्मचारी कामावर हजर झाले, याची आकडेवारी माझ्याकडे येईल. जे कर्मचारी हजर झाले त्यांच्यावर कारवाई होणार नाही. तसेच बडतर्फ आणि सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले असून उद्यापासून कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आम्ही […]
5 मिनिटे उशिरा आल्याने मुख्याध्यापकाने शिक्षिकेच्या कानाखाली मारली
शाळेत पोहोचण्यास 5 मिनिटे उशीर झाला म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाने उशीरा आलेल्या शिक्षिकेच्या दोन कानशिलात लगावल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील पसियापुरा गावात असणाऱ्या ज्युनियर हायस्कूल मध्ये सातवी आणि आठवी इयत्तेच्या परीक्षा सुरु होत्या. यामुळे शाळेचे मुख्याध्यापक शाळेत आधीच हजर झाले होते. शाळेतील एक शिक्षिका शाळेत 5 मिनिटे उशिरा पोहोचल्या. यावर मुख्याध्यापकांनी […]
आता दुकानाच्या पाट्यासाठी मराठीचा वापर करावाच लागणार
दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या तरतुदीत 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलक लावण्याची तरतूद नव्हती. याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, 2017 […]
आता शरद पवार करणार यूपीएचं नेतृत्व? अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव झाला मंजूर
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीत संपन्न झाली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भारतातील सध्याच्या कठीण राजकीय काळात शरद पवार यांना काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले […]
मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाची वडिलांकडून हत्या, तुकडे करून नदीत फेकले
मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाची तिच्या वडिलांनी निर्घृण हत्या केली आहे. हत्येनंतर त्याच्या मृतेदहाचे तुकडे करून ते नदीत फेकून देण्यात आल्याची घटना मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात घडली आहे. रविवारी येथील अजनल नदीत एक छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडला. पोलिसांनी तो ताब्यात घेतला. सोशल मीडियावर मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले आणि तेव्हा मयताची ओळख पटली. तो मध्य प्रदेशमधील सकतापूर येथे […]











