कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मुक्तसैनिक वसाहत इथं रात्री सभा सुरू पार पडली. सभा सुरू असताना एका बाजूने व्यासपीठाच्या दिशेने दगडे फिरकावण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटर करून याबद्दल माहिती दिली आहे. ‘वा रे बहादुरांनो, समोर यायची हिंमत नाही म्हणून सभेत दगडे मारता का? असा सवाल […]
ताज्याघडामोडी
महसूल अधिकारी ‘आरडीएक्स’, दंडाधिकारी जिवंत बॉम्ब
महसूल अधिकारी ‘आरडीएक्स’, तर दंडाधिकारी डिटोनेटर बनत आहेत. त्यामुळे जिवंत बॉम्ब तयार होत आहेत. जिल्ह्यात भूमाफियांनी सर्वसामान्यांची अक्षरशः लूट सुरू केलीय. महसूल अधिकारी त्यांच्या कह्यात आहेत. या भूमाफियांपासून नागरिकांना अभय मिळावे म्हणून महसूल दंडाधिकारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकार आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे अधिकार पोलीस आयुक्तांकडे द्यावेत, अशी मागणी करणारे खळबळजनक पत्र नाशिकचे नेहमी चर्चेत राहणारे […]
राज्यात गडगडाटासह पाऊस बरसणार, या जिल्ह्यांना अलर्ट जारी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भात उष्णतेची लाट आहे. पण, उन्हाच्या झळा कमी होऊन राज्यात परत पावसाचं आगमन होणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यात पडणार पाऊस – येत्या ५ एप्रिलला कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, […]
कर्ज परत केलं नाही म्हणून बायकोचे अश्लील फोटो व्हायरल केले, वसुली एजंटचा प्रताप
बँक, कंपनी अशा ठिकाणाहून कर्ज घेणाऱ्यांना नेहमी वसुली एजंटचे फोन येणं ही नेहमीची बाब. बऱ्याचदा असे एजंट धमक्याही देतात. त्यावरून वाद निर्माण होतात. पण एका वसुली एजंटने कर्ज घेणाऱ्या व्यक्तिच्या पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल केले आहेत. गुजरात येथील अहमदाबाद येथे हा प्रकार घडला आहे. एका अॅप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज घेणं एका इसमाला महागात पडलं आहे. कोरोना […]
फोनवर बोलताना अचानक फोनचा स्फोट, यूजर झाला जखमी
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोनवर बोलत असताना एका तरुणाच्य़ा हातातला मोबाईलचा अचानक स्फोट झाला आहे. या घटनेमध्ये तरुण जखमी झाला असून सुदैवाने तो बचावला आहे. युजरच्या भावाने ट्विट करत याबाबत माहिती आणि फोटो शेअर केले आहेत. वनप्लस नॉर्ड 2 स्मार्टफोनचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर एका युजरच्या भावाने दावा केला […]
फुकट भाजी न दिल्याने गुंडांनी विक्रेत्याला पाया पडायला लावले
फुकट भाजी दिली नाही, म्हणून गुंडांनी विक्रेत्या तरुणाला मारहाण करुन पाया पडायला लावले तसेच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. धनकवडी परिसरातील बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर येथील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या संबंधी चार व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात या गुंडांनी एका तरुणाला त्याच्या आईसमोर […]
तीन-चार महिने भूमिगत व्हायचं अन् मग एखादं लेक्चर द्यायचं; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली. शरद पवारांनाच असं राजकारण हवं असल्याचं म्हणत राज यांनी टीकास्त्र सोडलं. या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. राज यांनी राष्ट्रवादीचा गेल्या काही वर्षांतील इतिहास तपासावा, असा […]
वाळूच्या वादातून युवकाचा खून; सहाजणांवर गुन्हा
गेल्या वर्षी वाळू काढण्याच्या वादात झालेल्या खुनी हल्ल्याच्या रागातून प्रशांत भोसले याच्यासह सहाजणांनी युवकाचा तलवार, कोयत्याने वार करून खून केल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात सहाजणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगावमध्ये तणावाचे वातावरण असून, गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. वैभव विकास ढाणे (वय 28) […]
काहीजण पोलिसांना माफिया म्हणून त्यांची बदनामी करतात – उद्धव ठाकरे
समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी हे सरकार असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे. पोलिसांना राहण्यासाठी घरे, पोलीस ठाणे, सुविधा या प्रत्येक बाबतीत आपल्या सरकारने केवळ विचार न करता सकारात्मक कृती केली आहे. काही जणांना चांगली कामे पाहवत नाहीत, म्हणूनच ते पोलिसांना माफिया वगैरे म्हणत त्यांची बदनामी करतात. असे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]
पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल एनआयएच्या मुंबई शाखे कडे आला आहे. मोदींना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार असल्याचा उल्लेख मेल मध्ये असून त्यांना मारण्यासाठी 20 किलो आरडीएक्स तयार असल्याचे म्हणले आहे. धमकी देणाऱ्याने त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेला एक ई-मेल आला आहे. यामध्ये पंतप्रधान […]











