ताज्याघडामोडी

फोनवर बोलताना अचानक फोनचा स्फोट, यूजर झाला जखमी

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोनवर बोलत असताना एका तरुणाच्य़ा हातातला मोबाईलचा अचानक स्फोट झाला आहे. या घटनेमध्ये तरुण जखमी झाला असून सुदैवाने तो बचावला आहे. युजरच्या भावाने ट्विट करत याबाबत माहिती आणि फोटो शेअर केले आहेत.

वनप्लस नॉर्ड 2 स्मार्टफोनचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर एका युजरच्या भावाने दावा केला आहे की, वनप्लस नॉर्ड 2 फोनवर भाऊ बोलत असताना अचानर ब्लास्ट झाला. युजरच्या भावाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली. वनप्लस नॉर्ड 2 मध्ये झालेल्या स्फोटामुळे भावाच्या हाताला आणि चेहऱ्याच्या काही भागावर जखमा झाल्या आहेत.

सुदैवाने तो बचावला. ही गमतीची गोष्ट नाहीय यात त्याला गंभीर दुखापतही होऊ शकत होती असे ट्विट केले आहे. त्याचबरोबर ट्विटर युजरने भावाच्या फोनचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ब्लास्ट झालेला स्मार्टफोन दिसतोय. फोटोंमध्ये स्मार्टफोन ओळखणं कठिण होतंय. युजरच्या म्हणण्यानुसार हा फोन वनप्लस नॉर्ड 2 आहे. मात्र अजूनही स्मार्टफोन ब्लास्ट होण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

वनप्लसकडून याप्रकरणी काही माहिती दिलेली नाही. OnePlus Nord 2 मध्ये ब्लास्टचे हे पहिलेच प्रकरण नाही. याआधी गेल्यावर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला वनप्लस नॉर्ड 2 च्या स्फोटाची काही प्रकरणं समोर आली होती. कंपनीने हा स्मार्टफोन मागच्या वर्षी जुलै महिन्यात लॉन्च केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *