ताज्याघडामोडी

18 वर्षांच्या मुलांना मिळणार 22 वर्षांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स

टू व्हीलर किंवा कार ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्या 18 वर्षांच्या कॉलेज तरुणांसाठी चांगली बातमी आहे. मोटार वाहन दुरुस्ती कायद्यानुसार आता परवाना 22 वर्षांच्या कालावधीसाठी वैध असेल, असे ताडदेव RTO ने मंगळवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे: ताडदेव आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत काळसकर याविषयी म्हणाले कि ‘अनेक नागरिकांना वयोगटानुसार परवान्यांच्या वैधतेबद्दल माहिती नसते. […]

ताज्याघडामोडी

आईने केली दीड वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या

नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका मातेने आपल्या दीड वर्षीय मुलाची गळा दाबन हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी आरोपी मातेने आपला गुन्हा कबूल केला असून तिला अटक करण्यात आले आहे. अॅडिशनल एसपी अभिषेक राजननी सांगितले की, संजीत पंडित बिजुरी छत्तीसगड मध्ये ठेकेदारीचे काम करतात. त्यांची पत्नी पुष्पा आणि […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्न लावतो सांगून 200 मुलींना लावला चुना; शेवटी स्वत:लाच केलं मृत घोषित

उत्तर प्रदेशातील बस्ती पोलीस आणि सर्विलान्स टीमने एका गुन्हेगाराला अटक केली आहे. या नटवरलालवर देशातील अनेक राज्यांमधील 200 हून अधिक मुलींची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बस्तीतील एका मुलीची या गुन्हेगाराने फसवणूक केली. यानंतर हा खुलासा झाला. मुलीने तक्रार केल्यानंतर तपास सुरू झाला. यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की, यात केवळ एकच मुलगी नाही तर अशा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोर्टासमोर महिलेचा विनयभंग, उसने दिलेले पैसे परत मागितल्याने घडली घटना

करारावरती हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेचा विनयभंग केला. तसेच, सोशल मीडियावर. अश्लील फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. पिंपरी येथील मोरवाडी कोर्टासमोर चारचाकी गाडीत 10 फेब्रुवारी 2022 रोजी ही घटना घडली. पिडीत महिलेने दिलेल्या तक्रार अर्जावरुन तीन जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिरोज शब्बीर सय्यद, समीर मुलानी (दोघेही रा. यमुना नगर, निगडी […]

ताज्याघडामोडी

एसटी संपावरील सुनावणी पुढे ढकलली

राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते गैरहजर राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. सुनावणी दरम्यान, एसटी महामंडळाच्या वकिलांनी युक्तीवाद करताना म्हटले की, औद्योगिक न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवून सुद्धा निर्णय देऊन पण संप मागे घेण्यात आला नाही. […]

ताज्याघडामोडी

राजू शेट्टी यांचा मोठा निर्णय, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठा निर्णय घेत आघाडीला झटका दिला आहे. यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्यकार्यकारणी बैठकीत ही घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल म्हणाले, “स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. राजू […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेयसीच्या पतीसोबत FB वर मुलगी बनून त्यानं मैत्री केली, मग भेटायला बोलावलं अन्…

पान मसाला व्यापारी मुकेश पंडित यांची झारखंडमधील धनबादमध्ये २६ मार्च रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. या हत्येचा खुलासा करताना धनबाद पोलिसांनी मुकेशची पत्नी नीलम देवी आणि तिचा प्रियकर उज्ज्वल शर्मा यांना अटक केली आहे. उज्ज्वलच्या सांगण्यावरून मुकेशचा मोबाईल आणि पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या चौकशीत […]

ताज्याघडामोडी

सोशल मिडियावरील मैत्री विवाहितेला महागात; धमकी देऊन केला अत्याचार

सोशल मिडियाचा वापर अतिशय सावधगिरीने करा, असे आवाहन केले जात असले तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी फार कमी वेळा केली जाते. सोशल मिडियाचा फायदा घेऊन अनेक जण गैरप्रकार करीत असतात. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. शेअर चॅट या सोशल मिडिया अॅपच्या माध्यमातून विवाहितेवर बलात्कार झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप नगरसेवका विरोधात दरोड्यासह खंडणीचा गुन्हा दाखल

घर खाली करण्यासाठी घरात अनाधिकाराने प्रवेश करून कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सहा ते सातजणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुह्यात नवीन कलमांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता दरोडा, खंडणी व विनयभंग आदी कलमे वाढविण्यात आली आहेत. संभाजीनगर रोडवरील एका व्यक्तीने फिर्याद दिली होती. त्यानुसार नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभि बुलाखे […]

ताज्याघडामोडी

बुलेटसारखी इलेक्ट्रिक बाइक आणणार रॉयल एनफिल्ड

येत्या काही महिन्यांत आपली इव्ही TVS, Hero Motocorp, Ather आणि BMW सारख्या दुचाकी उत्पादक कंपन्या लाँच करणार आहेत. दरम्यान, बुलेट निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड आपली इलेक्ट्रिक बाइक लाँच करण्याच्या तयारीत आहे. याबाबत रॉयल एनफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल म्हणाले की, भारतीय बाजारपेठ, उत्पादन आणि जागतिक बाइक मार्केटनुसार इलेक्ट्रिक बाइक्सची श्रेणी आणि वैशिष्ट्ये यावर चर्चा केली […]