ताज्याघडामोडी

एसटी संपावरील सुनावणी पुढे ढकलली

राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते गैरहजर राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.

सुनावणी दरम्यान, एसटी महामंडळाच्या वकिलांनी युक्तीवाद करताना म्हटले की, औद्योगिक न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवून सुद्धा निर्णय देऊन पण संप मागे घेण्यात आला नाही. तसेच याचिका मागे घेत आहोत असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी १०.३० वाजता होणार आहे.

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्माचारी संपावर गेले आहे. गेल्या पाच महिन्यांहून अधिक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारने एसटीचे विलिनीकरण शक्य नसून संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

मात्र, संपकारी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. या आंदोलनादरम्यान, अनेक कर्मचाऱ्यांवर बडतर्फी तसेच निलंबनाची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात आत्महत्यादेखील केल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *