गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कामावरून काढल्याचा राग अनावर; कामगाराने मालकिणीला पेटवलं; होरपळून दोघांचा मृत्यू

कामावरुन कमी केल्याच्या रागातून टेलरिंग दुकानातील कामगाराने मालकिणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना वडगाव शेरी भागात घडली. या घटनेत मालकिणीसह तिला पेटवून देणाऱ्या कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. कामगार मिलींद गोविंदराव नाथसागर (वय ३५) आणि दुकान मालकिण बाला नोया जोनिंग (वय ३२ रा. मांदळे निवास, रामचंद्र […]

ताज्याघडामोडी

राज्यमंत्री बच्चू कडू अडचणीत, 1 कोटी 95 लाखांच्या अपहाराचा आरोप, गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडूंविरोधात तपास करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. कलम 156/3 अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकरांनी यासंदर्भात बच्चू कडूंविरोधात ही तक्रार दाखल केली […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगीच्या यशामध्ये मानाचा तुरा

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे यश   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यानी उल्लेखनीय यश प्राप्त केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेतलेल्या परीक्षेमद्धे कर्मयोगी अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी बालाजी रोंगे […]

ताज्याघडामोडी

6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाणार कोव्हॅक्सिन, DCGI ने दिली मान्यता

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने आज 6-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या मर्यादित वापरास परवानगी दिली आहे. DCGI ने लस उत्पादका कंपनीला पहिल्या दोन महिन्यांसाठी दर 15 दिवसांनी योग्य विश्लेषणासह प्रतिकूल घटनांच्या डेटासह सुरक्षितता डेटा सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले आहे, ज्यात त्यांनी लिहिले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्यासह मुलाच्या हत्येचा कट, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण ताजे असतानाच, मंत्री गडाख व त्यांचे पुत्र उदयन यांना ‘उडविण्याची’ भाषा करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासंदर्भात सोनई पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी आमच्याकडे अशी क्लिप नसल्याचे सांगितले. मंत्री गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर तालुक्यातील लोहगाव शिवारात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दंड भरण्यास सांगितल्याने तरुणाने डिझेल ओतून घेतले

ट्रिपल सीट जाताना सापडल्यामुळे वाहतूक पोलिसांनी तब्बल साडेसात हजार रुपयांचा दंड भरायला सांगितल्याने सैरभैर झालेल्या व वस्तुस्थिती सांगितल्यानंतरही गाडी सोडली जात नसल्याने वैतागलेल्या तरुणाने भरदुपारी भररस्त्यात अंगावर डिझेल ओतून घेतल्याची धक्कादायक घटना सातारा बसस्थानकानजीक घडली. सातारा बसस्थानक ते पोवई नाका या रस्त्यावरून तिघेजण एका दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी बसस्थानकाशेजारी सेव्हन स्टार कॉम्प्लेक्ससमोर कर्तव्य बजावत असलेले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भूताची भीती दाखवून साडेआठ लाखांचे दागिने लांबवले

घरात आत्म्याचा वावर आहे. वेळीच हवन आणि पूजा न केल्यास घरात वाईट घटना घडेल अशा भूलथापा मारून भोंदूबाबाने महिलेचे साडेआठ लाख रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना समोर आली आहे. फसवणूकप्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन जणांविरोधात फसवणुकीसह अंधश्रद्धा, अधोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पळून गेलेल्या त्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. तक्रारदार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जन्मदात्या आईनेच केली पाच महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या

जन्मदात्या आईनेच आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक, तोंड दाबून खून केल्याची घटना फलटण तालुक्यातील तरडगाव येथे घडली आहे. या आईला लोणंद पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांढरी तरडगाव येथे आरती सोमनाथ गायकवाड ही महिला राहते. या महिलेने लोणंद पोलीस स्टेशनला फोन करून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

संपत्तीच्या वादातून काकांनी पुतण्याला भररस्त्यात संपवलं; चाकूनं भोसकून हत्या

उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं भररस्त्यात एका युवकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचं उघड झाले आहे. काकाने मालमत्तेच्या वादातून पुतण्यावर जीवघेणा हल्ला केला. पुतण्याच्या मृत्यूपर्यंत निर्दयीपणे चाकूने भोसकण्यात आले. भररस्त्यात हा सगळा प्रकार घडत होता. मात्र युवकाला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. गुन्हेगारांना रोखण्याची कुणालाही हिंमत झाली नाही. ही सर्व घटना […]

ताज्याघडामोडी

उद्धव ठाकरे सरकारची तक्रार करायला किरीट सोमय्या दिल्लीत दाखल

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मुंबई भाजपच्या शिष्टमंडळासह दिल्लीत दाखल झाले आहेत. ठाकरे सरकारची तक्रार करायला आपण दिल्लीत आल्याचं सोमय्या म्हणाले. दोन दिवसांपूर्वी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात जात असताना, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या हनुवटीला किरकोळ दुखापत झाली. या हल्ल्याची तक्रार करण्यासाठी किरीट […]