ताज्याघडामोडी

रोड रेज प्रकरणी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने सुनावली एक वर्ष जेलची शिक्षा

माजी क्रिकेटर आणि राजकारणी नवज्योत सिंग सिद्धूला सर्वोच्च न्यायालयान एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 1988 साली केलेल्या मारहाणीत गुरुनाम सिंह या वृद्धाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जुन्या निकालात न्यायालयानं केवळ 1 हजार रुपयांचा दंड सुनावला होता. यावेळी पुर्नविचार याचिका दाखल केल्यानंतर हा निर्णय बदलत सर्वोच्च न्यायलयानं आता 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आली आहे. […]

ताज्याघडामोडी

घरगुती गॅस पुन्हा महागला; सर्वसामान्यांना आर्थिक फटका

मागील काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली असताना आता पुन्हा एकदा गॅस महागला आहे. मुंबईसह दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1000 रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. त्यानुसार, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसंच, व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 8 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या घरगुती आणि गॅस […]

ताज्याघडामोडी

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, राज्यात विधवा प्रथा बंद!

कोल्हापूर जिह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करून राज्यासमोर आदर्श ठेवला. हा आदर्श घेऊन आता राज्यभरात विधवा प्रथा बंद करण्याचा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. हेरवाड ग्रामपंचायतीच्या या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असे शासन परिपत्रक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नात मिळालेल्या ‘टेडी बिअर’मध्ये स्फोट; तरुणाची प्रकृती चिंताजनक

लग्नात नवदाम्पत्याला पुरस्काराच्या स्वरूपात ‘टेडी बिअर मिळाले. पुरस्कार उघडत असता स्फोट झाला आणि नवविवाहित तरुणासह पुतण्या गंभीर जखमी झाला. दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवविवाहित तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील वांसडा तालुक्यातील मिठंबरी येथे घडली. लतेश गावीत असे गंभीर जखमी नवविवाहिताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, लतेश गावीत आणि सलमा […]

ताज्याघडामोडी

‘पपा, मी चाललोय… तुम्ही लवकर या…’; वडिलांना फोन करून प्राध्यापक मुलाची आत्महत्या

पप्पा, मी चाललाेयं.. तुम्ही लवकर या… असा फोन वडिलांना करून प्राध्यापक मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रा. नितीन विठ्ठल तुपसौंदर (वय ३०, रा. खोकरमोहा, ता. शिरूर, हमु. चऱ्हाटा फाट्याजवळ, बीड ) असे मृताचे नाव आहे. ते पिंपळनेर (ता. बीड) येथील जीवनदीप महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी माहेरी गेली होती. निवृत्त मुख्याध्यापक असलेले […]

ताज्याघडामोडी

विवाहानंतर महिनाभरात नववधू सोने-चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पसार

लग्न करताना सावधान राहा. कारण लग्न झाल्यानंतर तुमची मोठी फसवणूक होवू शकते. होय, हे खरं आहे! सद्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात काही ठिकाणी लग्नाळू व्यक्तीची फसवणूक करण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. विवाहानंतर महिनाभरात नववधू सोने-चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पलायन केलेच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच घटना गुन्हा वस्त्रोद्योग नगरी इचलकरंजीमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच […]

ताज्याघडामोडी

जगू द्याल का नाही? राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले

सडेतोड आणि परखड भाष्य करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. पण, आज याचीच झलक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहण्यास मिळाली. जगू द्याल की नाही? असा सवाल करत राज ठाकरे पुण्यात पत्रकारांवर भडकले. राज ठाकरे अचानक भडकल्यामुळे पत्रकारांमध्येही गोंधळ उडाला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. पुण्यात 21 मे रोजी राज ठाकरेंची […]

ताज्याघडामोडी

हवामानाचा अंदाज घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार, जुलैपर्यंत निवडणुका नाहीच; मदान यांची मोठी माहिती

ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी निवडणुका का घेत नाहीत? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आज केला. त्यामुळे निवडणूक आयोगही कामाला लागला आहे. जेव्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या टप्प्यावर निवडणूक आयोग पोहचेल त्यावेळी निवडणूक आयोग हवामान विभाग आणि स्थानिक यंत्रणा यांच्याशी चर्चा करून निर्णय घेईल. जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महापालिकेच्या प्रलंबित निवडणुका […]

ताज्याघडामोडी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे निर्देश

राज्यात अतिरिक्त ऊसाचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. मे महिना अर्धा सरला तरी लाखो शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस अजूनही उभा आहे. राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर […]

ताज्याघडामोडी

वायर चोरण्यासाठी आला आणि जीव गमावून बसला, इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून चोराचा मृत्यू

डोंबिवली – येथील पुर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील केडीएमसीच्या बीएसयूपी प्रकल्पाच्या इमारतीत वायर चोरण्यासाठी आलेल्या दोघा चोरटयांपैकी एक चोरटयाचा पळताना आठव्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मोहम्मद सलिम भाटकर (वय 24) असे मृत चोरटयाचे नाव असून तो चोरीच्या गुन्हयात सराईत होता. त्याचा सहकारी अरफान पिंजारी हा जखमी झाला असून त्याच्यावर मनपाच्या शास्त्रीनगर रूग्णालयात […]