ताज्याघडामोडी

घरगुती गॅस पुन्हा महागला; सर्वसामान्यांना आर्थिक फटका

मागील काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली असताना आता पुन्हा एकदा गॅस महागला आहे. मुंबईसह दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1000 रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.

त्यानुसार, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसंच, व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 8 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

गुरुवारी जारी करण्यात आलेल्या घरगुती आणि गॅस सिलिंडरच्या आकडेवारीनुसार मुंबई आणि राजधानी दिल्लीत 14.2 गॅस सिलिंडरचे दर 1 हजार 3 रुपये इतके झाले आहेत. कोलकातामध्ये हे दर 1,029 रुपये इतका झाले आहेत. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1018 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे.

दरम्यान, मागील 12 दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत दरवाढ करण्यात आली आहे. याआधी 7 मे रोजी गॅस सिलिंदरची दरवाढ करण्यात आली होती. 7 मे रोजी 50 रुपयांची दरवाढ करण्यात आलेली. आता गेल्या 12 दिवसांत तब्बल 53.50 रुपयांनी गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत.

प्रमुख शहरातील घरगुती गॅसच्या किंमती

दिल्ली – 1003 रुपये प्रति सिलेंडर

कोलकाता – 1029 रुपये प्रति सिलेंडर

मुंबई – 1002.50 रुपये प्रति सिलेंडर

चेन्नई – 1018.50 रुपये प्रति सिलेंडर

प्रमुख शहरातील व्यावसायिक गॅसच्या किंमती

दिल्ली – 2354 रुपये प्रति सिलेंडर

कोलकाता – 2454 रुपये प्रति सिलेंडर

मुंबई – 2306 रुपये प्रति सिलेंडर

चेन्नई – 2507 रुपये प्रति सिलेंडर

देशभरात मागील अनेक दिवसांपासून सतत महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल यांसह सीएनजी आणि घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ होत आहे. या दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामन्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *