गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एकतर्फी प्रेमातून 6 मुलांच्या आईवर भररस्त्यात चाकूनं वार, हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित आणि सहा मुलांची आई महिलेवर असलेल्या एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणानं हल्ला केला आहे. शुक्रवारी रस्त्याच्या मधोमध तरुणानं महिलेवर वार केले आहे. IANS या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातली माहिती दिली आहे. महिलेनं तरुणाशी लग्न करण्यास नकार दिला होता, हे ऐकून तरुण वेडा झाला. महिलेचा पाठलाग करत त्याने शुक्रवारी भरदिवसा तिच्यावर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नी चुकीच्या संगतीला लागली म्हणून पतीकडून गळा आवळून हत्या

पत्नी चुकीच्या महिलेच्या संगतीला लागली आणि वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने पती ने गळा आवळून पत्नी ची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगाव परिसरात घडली आहे. अन्सार अली असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. तर रोझी खातून असे मयत पत्नीचे नाव आहे. महिलेच्या बहिणीने याबाबत फिर्यादीला माहिती दिल्यानंतर हत्येचा गुन्हा उघडकीस आला. पत्नीची हत्या केल्यानंतर […]

ताज्याघडामोडी

मी म्हणतो तेच सत्य, वडिलांच्या गौप्यस्फोटावर मी काही बोलणार नाही, संभाजीराजेंचं ट्विट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असं म्हणणं योग्य नाही. आतापर्यंत सगळ्यांनीच छत्रपती घराण्याचा सन्मान केला आहे. सेनेने उमेदारी दिली नाही म्हणून छत्रपती घराण्याचा अपमान केला असं म्हणता येणार नाही”, अशा शब्दात श्रीमंत छत्रपती शाहूराजे यांनी संभाजीराजेंचे कान टोचले होते. तसेच संभाजीराजेंच्या अपक्ष लढणाऱ्या खेळीला कदाचित फडणवीसांची साथ असू शकते, असा अंदाजही त्यांनी लावला होता. शाहू […]

ताज्याघडामोडी

मुलाला मामाच्या घरी न पाठवल्याचा राग, जावयाला टेम्पोखाली चिरडून सासऱ्याने केलं ठार

सासऱ्यानेच आपल्या जावयाच्या अंगावर टेम्पो नेत त्याला चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला मामाच्या घरी पाठवत नसल्याने नसल्याचा राग आल्याने सासऱ्याने जावयाला ठार केल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? कर्जत तालुक्यातील कौडणा आणि मुळेवाडी येथील […]

ताज्याघडामोडी

राज्यात सरकारी बदल्यांना स्थगिती, 30 जूनपर्यंत कोणतीही प्रशासकीय बदली नाही, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

बदल्यांसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी किंवा बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्यांना आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. राज्य सरकारने याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घएतला आहे. ३० जूनपर्यंत राज्यात एकही सरकारी बदली करु नये, असे आदेशच राज्य सरकारने काढले आहेत. त्यामुळे आता पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रशासनातील एकही बदली होणार नाहीये. अगदीच तातडीची बदली असेल ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

ताज्याघडामोडी

येरवड्यातील सराईत टोळीवर मोक्का; आतापर्यंत 81 टोळ्या गजाआड, पोलीस आयुक्तांचा धडाका

कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्काअस्त्राचा प्रभावी वापर करीत सराईत टोळ्यांचा बिमोड करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत साळवे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत 81 टोळ्यातील 623 हून अधिक गुंडांची कारागृहात रवानगी करून गुन्हेगारीचे वंâबरडे मोडले आहे. निलेश उर्फ पिन्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नातीची छेड काढल्याचा सूनेचा आरोप, माजी परिवहनमंत्र्यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

उत्तराखंडच्या माजी परिवहन मंत्र्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 59 वर्षीय राजेंद्र बहुगुणा यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या सूनेने त्यांच्यावर नातीसोबत छेडछेड केल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप सहन न झाल्याने अखेर त्यांनी मृत्यूला कवटाळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुगुणा यांच्या सूनेने त्यांच्याविरुद्ध नातीसोबत छेडछोड केल्याची तक्रार दाखल केली होती. […]

ताज्याघडामोडी

दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार? शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडूंनी सांगितली ‘ही’ तारीख

कार्यक्रमात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी खास बातचित करण्यात आली. यावेळी त्यांनी शिक्षण शेत्रातील अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणानं बातचित केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र बोर्ड दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती दिली. बोर्डाचे निकाल येत्या 15 दिवसांत जाहीर करु असं ते म्हणाले. तसेच, निकाल उशीरा लागल्यामुळे त्यानंतरची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करु असंही ते म्हणाले […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुन्हा कोरोना वाढतोय, मास्क वापरा; मुख्यमंत्री ठाकरेंच आवाहन

कोरोनाबाधितांमध्ये संथपणे वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असून जनतेने मास्क वापरत रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले.राज्याची साप्ताहिक संसर्ग दर १.५९ टक्के असून, मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक संसर्ग दर आढळून आला आहे. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून, ठाण्यामध्ये २७.९२ टक्के […]

ताज्याघडामोडी

‘मी फक्त जनतेशी बांधील!’; संभाजीराजेंची भावनिक पोस्ट

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव संभाजीराजे यांच्यापुढे शिवसेनेकडून मांडण्यात आला. मात्र, राज्यसभेसाठी उमेदवारी शिवसेनेकडून न लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहिर केल्यामुळे संभाजीराजे यांना मविआचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. संभाजीराजे यांनी पोस्टमध्ये लिहिले, ‘मला छत्रपती शिवाजी […]