कार्यक्रमात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी खास बातचित करण्यात आली. यावेळी त्यांनी शिक्षण शेत्रातील अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणानं बातचित केली.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र बोर्ड दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती दिली. बोर्डाचे निकाल येत्या 15 दिवसांत जाहीर करु असं ते म्हणाले. तसेच, निकाल उशीरा लागल्यामुळे त्यानंतरची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करु असंही ते म्हणाले आहेत.
दहावी , बारावीचा निकाल कधी लागणार? मे अखेरपर्यंत हा निकाल लागतो, पण यंदा काहीसा उशीर होणार आहे, त्यामुळे अकरावी प्रवेशासाठीही उशीर होणार का? असा प्रश्न विचारल्यावर याबाबत बोलताना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं की, “दहावी, बारावीचे निकाल येत्या पंधरा दिवसांत जाहीर करु.
जरी उशीर झाला, तरी दहावीनंतरची अकरावी प्रवेश प्रक्रिया आणि बारावीनंरची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करु.” तसेच, 20 जूनपर्यंत दहावी, बारावीचे निकाल जाहीर होतील का? असं विचारल्यावर “शक्यता आहे. मी निश्चितपणे सांगू शकत नाही. पण 20 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे, असं बच्चू कडू म्हणाले.