ताज्याघडामोडी

मी म्हणतो तेच सत्य, वडिलांच्या गौप्यस्फोटावर मी काही बोलणार नाही, संभाजीराजेंचं ट्विट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असं म्हणणं योग्य नाही. आतापर्यंत सगळ्यांनीच छत्रपती घराण्याचा सन्मान केला आहे. सेनेने उमेदारी दिली नाही म्हणून छत्रपती घराण्याचा अपमान केला असं म्हणता येणार नाही”, अशा शब्दात श्रीमंत छत्रपती शाहूराजे यांनी संभाजीराजेंचे कान टोचले होते. तसेच संभाजीराजेंच्या अपक्ष लढणाऱ्या खेळीला कदाचित फडणवीसांची साथ असू शकते, असा अंदाजही त्यांनी लावला होता. शाहू महाराजांच्या या सगळ्या गौप्यस्फोटानंतरही संभाजीराजे आपल्या शब्दावर ठाम आहेत. “छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे”, असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.

संभाजीराजेंनी लढण्याआधीच तलवार म्यान केल्याने विविध नेत्यांच्या उलट सुलट प्रतिक्रया येत आहेत. अशातच संभाजीराजेंच्या माघाराविषयी त्यांचे वडील शाहू छत्रपती यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना उद्धव ठाकरेंना सॉफ्ट कॉर्नर देत राजेंच्या माघारीला फडणवीसांना जबाबदार धरलं. आपल्या वडिलांच्या गौप्यस्फोटावर संभाजीराजे काय बोलणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर त्यांनी ट्विट करत आपण आपल्या शब्दावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे, असा पुनरुच्चार करत माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, असं म्हणत संभाजीराजेंनी आजच्या राजकीय वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *