जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पंढरपूर रोटरी क्लब व एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या संयुक्त विद्यमानाने ५ जुन या दिवशी नमामी चंद्रभागा नदी जाऊ स्वच्छता करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड कॉलेज च्या […]
ताज्याघडामोडी
सोमवारी नारायण चिंचोलीत शिवराज्याभिषेक सोहळा व विविध विकास कामांचे भूमिपूजन,लोकार्पण
आ.बबनदादा शिंदे,मा.आ.प्रशांत परिचारक,जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांची उपस्थिती सूर्यनारायण देवाचे प्राचीन मंदिर असलेले एकमेव तीर्थस्थळ म्हणून ओळख असलेल्या नारायण चिंचोली येथे सोमवार दिनांक ६ जून सकाळी ठीक ९ वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याच बरोबर विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी आमदार व पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय! संपूर्ण राज्यात ६ जून ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार
राज्यात सोमवार म्हणजेच 6 जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य […]
निलंग्याचे तहसिलदार गणेश जाधव दीड लाखाची लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात
बेकायदा वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी व ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी दीड लाखांची लाच स्विकारताना निलंगा तहसीलचे विद्यमान तहसीलदार गणेश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. लातूरच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन ही कारवाई केली आहे. लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाकडे मागील 25 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार 26, 28, 30, 31 […]
जुने स्टॅम्प पेपर आजच्या तारखेत विकणाऱ्या चौघांना अटक, लाखो रुपाये किमतीचे स्टॅम्प जप्त
एखाद्या गुन्हेगाराला न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर त्याला सॉलवेंसी (बाँड) तयार करावा लागतो, त्यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे म्हणजेचं दस्तावेज (डॉक्युमेंट) बोगस तयार करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला होता. त्यानंतर आता नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका टोळीचा पर्दाफास केला आहे. ही टोळी जुने स्टॅम्प पेपर आजच्या तारखेत विकत होते. या प्रकरणात नागपूर गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक करण्यात […]
राज्यात मास्क सक्ती नाही; कोरोना वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आरोग्यमंत्र्याचे आवाहन
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू करण्यात आल्याची चर्चा आज सकाळपासून सुरू झाली होती. यासंदर्भात एक सूचना पत्र देखील व्हायरल झाले होते. यासंदर्भात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, राज्यात मास्कची सक्ती नाही. मास्क सक्ती विषयी चर्चा सुरू असली, तरी […]
फेक इंस्टाग्राम अकाऊंटवर अश्लील फोटो अपलोड; मुलीची आत्महत्या
सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करून महिलांची बदनामी करण्याच्या अनेक घटना घडत आहेत. अशीच एक घटना तेलंगाणात घडली आहे. डिस्प्ले पिक्चरसह बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून अश्लील मेसेज आणि फोटो पोस्ट केल्याने एका मुलीने आत्महत्या केली. आदिलाबाद जिल्ह्यातील इचोडा भागातील नरसापूर गावात ही घटना घडली आहे. नरसापूर येथील एका मुलीने (१५) नुकतीच दहावी पूर्ण केली. एका […]
दीड कोटीच्या खंडणीला वैतागून लातूरात डॉक्टरची आत्महत्या
लातूर: जिल्ह्यातील उदगीर येथील महेशकुमार जिवणे यांनी कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्यांची आई कै. शांताबाई त्र्यंबकराव जिवणे या आजारी असल्याने उदयगिरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान शांताबाई जिवणे यांचा मृत्यू झाला. जुलै,2021 मध्ये महेशकुमार यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करुन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांच्या मातोश्रींना डॉ.नामदेव गिरी व डॉ.माधव चंबुले […]
उस्मानाबाद, औरंगाबादच्या नामांतराची प्रक्रिया पूर्ण; खैरेंचं मोठं विधान
राज्यातील उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या नामांतराबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसांपासून अशी मागणी होती असे खैरे यावेळी म्हाणाले. कार्यकर्त्यांची इच्छा खूप होती, धाराशिव व संभाजीनगर नावे अधिकृत कधी होणार अशी विचारणा केली […]
16 महिन्यांच्या लेकीवर बलात्कार करून केला खून, बापाला आणि आईला मरेपर्यंत फाशी!
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अवघ्या 16 महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार करून गळा आवळून नराधम बापाने खून केला होता. अखेरीस सहाच महिन्यात न्यायालयाने या नराधम बापासह आईला फाशीची शिक्षा सुनावली आहे. सोलापूर येथे सोळा महिन्याच्या चिमुकलीवर बापाने अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या […]











