ताज्याघडामोडी

जुने स्टॅम्प पेपर आजच्या तारखेत विकणाऱ्या चौघांना अटक, लाखो रुपाये किमतीचे स्टॅम्प जप्त

एखाद्या गुन्हेगाराला न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर त्याला सॉलवेंसी (बाँड) तयार करावा लागतो, त्यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे म्हणजेचं दस्तावेज (डॉक्युमेंट) बोगस तयार करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला होता. त्यानंतर आता नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका टोळीचा पर्दाफास केला आहे. ही टोळी जुने स्टॅम्प पेपर आजच्या तारखेत विकत होते. या प्रकरणात नागपूर गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जुने स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले आहेत.

राज्यात काही वर्षांपूर्वी स्टॅम्प पेपर घोटाळा चांगलाच गाजला होता. त्यानंतर स्टॅम्प पेपर खरेदी- विक्री संदर्भात कडक नियम तयार केले होते. त्यानंतरही नागपुरातील गुन्हेगारांनी जुने स्टॅम्प पेपर आजच्या तारखेत विक्री केले जात असल्याची माहिती समजताच गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाबाहेरील व्हेंडर्सवर छापा टाकून चार व्हेंडर्सला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या जवळून लाखो रुपयांचे जुने स्टॅम्प पेपर्स जप्त केले आहेत.

जुन्या तारखेचे स्टॅम्प पेपर आजच्या तारखेत विकताना ते चढ्या दरात विकले जात होते. स्टॅम्प पेपर विक्री करणारे व्हेंडर्स जुने स्टॅम्प साठवून ठेवायचे, त्याची नोंदणी करणाऱ्या रजिस्टर मध्ये तेवढी जागा कोरी सोडली जायची. ग्राहक आला की मागच्या तारखेच्या जाऊन त्या स्टॅम्प पेपरची नोंद करायची आणि त्याच्या कडून जास्त पैसे घ्यायचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *