पैशाच्या व्यवहारातून सुरू झालेल्या वादातून चंद्रपूर जिल्ह्यात एक अत्यंत क्रूर घटना घडली आहे. एका तरूणाच्या पाठीवर भला मोठा दगड बांधून त्याला विहीरीत फेकण्यात आले. यात त्या तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाला. मोरवा गावात राहणाऱ्या प्रवीण घिवे या युवकासोबत गावातील काही युवकांनी पैशावरून वाद घातला. त्यानंतर सदर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. युवकांनी मिळून प्रवीणला मारहाण केली. मात्र […]
ताज्याघडामोडी
उमेदवारी न मिळाल्याने संताप, भाजपा कार्यालयासमोर मुंडे समर्थकांचा राडा
भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. औरंगाबादमद्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी भाजपाचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच कारवाई करत कार्यकर्त्यांना रोखले. पोलिसांनी तीन कार्याकर्त्यांना तब्यात घेतले आहे. भाजपाने पंकजा यांना डावलत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. तसंच विरोधी […]
सिंहगड पंढरपूर मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे ‘टोटल स्टेशन’ या विषयावर वर्कशॉप उत्साहात संपन्न
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील स्थापत्य इंजिनिअरींग विभाग व सिव्हिल इंजिनीअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (सेसा) यांच्या संयुक्त विद्यमाने व काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णीयांच्या मार्गदर्शनाखाली “टोटल स्टेशन या विषयावर वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते व हे वर्कशॉप उत्साहात संपन्न झाले अशी माहिती सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम […]
सोलापूरच्या अन्न प्रशासनाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव
जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त दिल्लीत गौरव ईट राईट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल येथील अन्न व औषध प्रशासनाचा भारतीय अन्न सुरक्षा व प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला. जदीपकुमार राऊत आझादी का अमृत महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अन्न सुरक्षा व मानके कायद्यांच्या अंमलबजावणीसह ग्राहक जागृती, जनजागृती पोस्टर्स, अन्न परवाने व नोंदणी कामकाज, अन्न व्यावसायिकांचे प्रशिक्षण,ईट राईट […]
शालेय विद्यार्थ्यामध्ये मूल्यवर्धन होणे गरजेचे – श्री.महारुद्र नाळे, गटशिक्षणाधिकारी, पंढरपूर
सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्याने सर्व पालक हे विद्यार्थ्यांकडे स्पर्धक म्हणून पहात आहेत. त्यामुळे विद्यार्थी मुल्यावार्धतेपासून दूर जाताना दिसत असले तरी विद्यार्थ्यामध्ये मूल्यवर्धन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी सोमवार, दि.०६ जून रोजी केले. श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे मुथ्था फाउंडेशन पुणे व कर्मयोगी फाउंडेशन पंढरपूर […]
फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘शिवराज्याभिषेक दिन सोहळा’ संपन्न
सांगोला: महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ दिवशी राज्याभिषेक झाला आणि आपल्या स्वराज्याला छत्रपती मिळाले. याच ऐतिहासिक घटनेचं महत्त्व दृढ करण्यासाठी शिवप्रेमी ६ जून हा दिवस ‘शिवराज्याभिषेक दिन सोहळा’ म्हणून साजरा करतात. फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर व कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांच्या हस्ते छत्रपती […]
साहित्यिक मानवताधर्म जपत असतात- आप्पासाहेब खोत
ज्ञानसमृद्धी आणि रानशिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण सर्जनासाठीची प्रार्थना ही प्रतिभावंताच्या काळजातले कारुण्य असते आणि त्याच संवेदनशील हृदयातून पाझरणाऱ्या शब्दाने समाजमनाच्या जाणिवेला अविरत प्रवाहित ठेवण्याचा मानवताधर्म साहित्यिक करत असतात, म्हणून समाजाची वाटचाल योग्य दिशेने होत असते. त्या साहित्यिकांचा सन्मान या दोन्ही संस्था करत आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटतो. साहित्य हे माणसाला समृद्ध करत […]
प्रतीक्षा संपली ! १२ वी चा निकाल उद्या लागणार ; येथे पहा निकाल
जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात १२वी चा निकाल लागणार अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. मात्र आता मिळलेल्या माहितीनुसार १२ वी चा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी ८ जूनला लागणार आहे. दरम्यान बऱ्याच अडचणींचा सामना करीत या परीक्षा झाल्या होत्या. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी पेपर चेकिंगवर बहिष्कार टाकला आणि बारावीचा रिझल्ट कसा लागणार […]
लग्नातील जेवण महागात: ९३ वऱ्हाड्यांना विषबाधा; सात लहानग्यांचाही समावेश
विवाह सोहळ्यातील जेवणातून तब्बल ९३ जणांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली. यामध्ये सात लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्वांना कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालय तसंच खासगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं आहे. वैद्यकीय पथकाने तातडीने रुग्णांवर उपचार सुरू केले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील मदिना नगर नुरी मोहल्ला भागातील […]
कर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी, पुन्हा एकदा कर्जाचे हप्ते महागणार?
महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामांन्यांना आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे. कर्जदारांच्या खिशाला आणखी कात्री लागू शकते. येत्या बुधवारी पुन्हा एकदा कर्जाचे हप्ते महागू शकतात. रिझर्व्ह बँक 8 जून रोजी पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. यावेळी रेपो दरात अर्ध्या टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. कोरोनाच्या काळात रिझर्व्ह बँकेनं केलेली व्याजदरातील कपात मागे घेण्याच्या प्रक्रियेला गेल्या महिन्यापासून सुरुवात […]











