ताज्याघडामोडी

साहित्यिक मानवताधर्म जपत असतात- आप्पासाहेब खोत

ज्ञानसमृद्धी आणि रानशिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण

 

सर्जनासाठीची प्रार्थना ही प्रतिभावंताच्या काळजातले कारुण्य असते आणि त्याच संवेदनशील हृदयातून पाझरणाऱ्या शब्दाने समाजमनाच्या जाणिवेला अविरत प्रवाहित ठेवण्याचा मानवताधर्म साहित्यिक करत असतात, म्हणून समाजाची वाटचाल योग्य दिशेने होत असते. त्या साहित्यिकांचा सन्मान या दोन्ही संस्था करत आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटतो. साहित्य हे माणसाला समृद्ध करत असते, म्हणून माणसाने साहित्य वाचनाकडे भर दिला पाहिजे, त्यातूनच माणूस घडत असतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक कथाकार आप्पासाहेब खोत यांनी व्यक्त केले. ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालय खेडभाळवणी यांच्यावतीने स्व. कुबेर पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या आणि बळीराजा प्रतिष्ठान, शेळवे यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथे बोलत होते.

          यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा. आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, दोन्ही संस्था या लिहित्या हातांना बळ देणाऱ्या आहेत, निश्चित त्यांचे काम हे कौतुकास्पद आहे. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक प्रकाश गव्हाणे, आयुर्वेदाचार्य बाबू पांडकर, कल्याण शिंदे, साहित्यिक शिवाजी बागल, भास्कर बंगाळे, सूर्याजी भोसले, हरिश्चंद्र पाटील, बिभीषण पवार, शहाजी साळुंखे, प्राचार्य-एम.एम.गाजरे, वाचनालयाचे संस्थापक सचिव- राजेश पवार, बळीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष- प्रकाश गाजरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब साळुंखे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक अंकुश गाजरे यांनी केले, आभार राजेश पवार यांनी मानले, तर सूत्रसंचालन समाधान काळे यांनी केले

        

        या लेखकांना सन्मानित करण्यात आले

*१.दि.बा. पाटील, सांगली

२.दीपक तांबोळी, जळगाव

३.जीवन पाटील,पंढरपूर

४.बाळासाहेब गोफणे, कराड

५.संतोष, कांबळे, नाशिक

६.शुभांगी तरडे, सातारा

७.शिवाजी सातपुते, मंगळवेढा

८. आबासाहेब घावटे, बार्शी

९.संभाजी अडगळे, भोसे

 

*१.कल्लाप्पा पाटील, चंदगड, कोल्हापूर

२. प्रकाश सकुंडे, फलटण,सातारा

३.लता बहाकर, अकोला

४. सिराज शिकलगार, पलूस, सांगली

५. रमेश तांबे, मुंबई

६.प्रा.रसुल सोलापुरे, गडहिंग्लज, कोल्हापूर

७. संदेश बांदेकर, कारवार

८.रविराज सोनार, पंढरपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *