ताज्याघडामोडी

सोलापूरच्या अन्न प्रशासनाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव

जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त दिल्लीत गौरव

ईट राईट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल येथील अन्न  व औषध प्रशासनाचा भारतीय अन्न सुरक्षा व प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला. जदीपकुमार राऊत आझादी का अमृत महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अन्न सुरक्षा व मानके कायद्यांच्या अंमलबजावणीसह ग्राहक जागृती, जनजागृती पोस्टर्स, अन्न परवाने व नोंदणी कामकाज, अन्न व्यावसायिकांचे प्रशिक्षण,ईट राईट कॅम्पस, धार्मिक स्थळांमधील प्रसादाची स्वच्छता व सुरक्षा, फुटपाथवर विक्री होणाऱ्या अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत “हमी आदी निकषावर देशभरातून उत्तम कामगिरी करणाऱ्या ७५ जिल्ह्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याने २१ वा क्रमांक पटकावून बाजी मारली आहे.

जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन अन्न सुरक्षा आयुक्‍त परिमल सिंह यांचा सन्मान करण्यात आला.

सोलापूर कार्यालयाने या स्पर्धेमध्ये सर्वस्तरावर चांगली कामगिरी केली आहे. दैनंदिन अंमलबजावणीसह पार्क चौक चौपाटीला क्लिन स्ट्रीट फुड हबचा दर्जा मिळवून दिला. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालय, जिल्हा कारागृह, जेलरोड कॅन्टीनला ईट राईट कॅम्पसचा दर्जा मिळवून दिला आहे.

सोलापूर शहरातील लक्ष्मी मार्केट व कस्तुरबा मार्केट येथील फळे व भाजीपाला मार्केटसाठी क्लिन अँण्ड फ्रेश फ्रुट अँण्ड व्हेजिटेबल मार्केटचा दर्जा मिळालेला आहे. तसेच केएलई शाळेस ईट राईट स्कूलचा दर्जा मिळालेला आहे.

सोलापूर जिल्ह्याला हा बहूमान मिळवून देण्यासाठी आयुक्‍त परिमल सिंह, सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कार्यालयाचे सहायक आयुक्‍त (अन्न) प्रदीपकुमार राऊत, अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, रेणुका पाटील, उमेश भुसे, प्रशांत कुचेकर, नंदिनी हिरेमठ यांनी कठोर परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *