सांगोला: महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ दिवशी राज्याभिषेक झाला आणि आपल्या स्वराज्याला छत्रपती मिळाले. याच ऐतिहासिक घटनेचं महत्त्व दृढ करण्यासाठी शिवप्रेमी ६ जून हा दिवस ‘शिवराज्याभिषेक दिन सोहळा’ म्हणून साजरा करतात. फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर व कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली तसेच गडकोट किल्यांच्या चित्रांचे प्रदर्शन याठिकाणी भरविण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे,फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी एन. जगताप, डॉ.नरेंद्र नार्वे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.