ताज्याघडामोडी

सिंहगड पंढरपूर मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे ‘टोटल स्टेशन’ या विषयावर वर्कशॉप उत्साहात संपन्न

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील स्थापत्य इंजिनिअरींग विभाग व सिव्हिल इंजिनीअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (सेसा) यांच्या संयुक्त विद्यमाने व काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णीयांच्या मार्गदर्शनाखाली
“टोटल स्टेशन या विषयावर वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते व हे वर्कशॉप उत्साहात संपन्न झाले अशी माहिती सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.

हे वर्कशॉपमुळे विध्यार्थ्यांना टोटल स्टेशनद्वारे  रस्ते, प्लॉट आणि बिल्डिंग चा सर्वे करण्यास फायदा होणार आहे व तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नोकरीत संधी मिळण्याच्या प्रक्रियेतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा सराव म्हणून आयोजित केले होते.

या वर्कशॉप अंतर्गत तीस विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. हा वर्कशॉप पार पाडण्यासाठी डॉ. श्रीगणेश कदम, प्रो. शेखर पाटील व विदयार्थी प्रतिनिधी म्हणून प्रमोद सोळंकी, ऋतुजा शिंदे यांनी जबाबदारी पार पाडली, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक प्रो. चंद्रकांत देशमुख यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *