सलून मालकाने केली ग्राहकाची हत्या जमावाने केली सलून दुकानदाराची हत्या अर्धी दाढी झाल्यावर दाढीचे पैसे दे असे म्हणून तगादा लावल्याने, झालेल्या वादात सलून चालकाने आपल्या जवळील धारदार शस्त्राने ग्राहकाचा गळा कापून खून केला. तर या घटनेमुळे संतप्त झालेल्या अज्ञात जमावाने सलूनच्या मालकाचा ठेचून खून केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील किनवट येथे घडली आहे. बोधडी येथील बाजारपेठेत […]
ताज्याघडामोडी
सैराट चित्रपटातील आर्चीच्या भावा विरोधात पोलीस कारवाई करणार; प्रिन्सचे धक्कादायक प्रताप उघडकीस
मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला फसवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी गजाआड केल्यानांतर या मध्ये मोठे रॅकेट असल्याचे निष्पन होत असून एका गाजलेल्या चित्रपटातील कलाकाराचा सहभाग असल्याने राहुरीचे पोलीस लवकरच प्रसिद्ध चित्रपट सैराट मधील प्रिन्स सूरज पवारच्या मुसक्या आवळणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस प्रताप दराडे यांनी दिली आहे. सविस्तर माहिती अशी की, महेश […]
पोलिसानेच लुटले सराफा व्यापाऱ्याचे २४ तोळे सोने, ८ लाखांची रोकड
पोलीस दलात खळबळ उडून देणारी धक्कादायक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. चक्क एका पोलीस कर्मचाऱ्यानेच सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वाघ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. संतोष वाघ याने आपला मित्र […]
गृहपाठ न केल्यामुळे शिकवणी शिक्षिकेने साडेतीन वर्षांच्या मुलीचा जाळला गाल, गुन्हा दाखल
खारघर येथे गृहपाठ न केल्यामुळे शिकवणी शिक्षिकेने साडेतीन वर्षांच्या मुलीचा गाल जाळला. या प्रकरणी कुटुंबीयांनी खारघर पोलिस ठाण्यात जाऊन शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध आयपीसीच्या कलम 234 आणि बाल न्यायाच्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिला मकरंद विहार येथील घरकुल सोसायटी सेक्टर 15 मध्ये असलेल्या तिच्या घरी शिकवणी वर्ग […]
भविष्यकाळ हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णकाळ असेल’-उद्योजक सुधीर मुतालिक
स्वेरीमध्ये ‘अभियंता दिन’ साजरा व ‘ऑलम्पस २ के २२’चे थाटात उदघाटन ‘जेंव्हा मी पदवीचे शिक्षण पूर्ण केले तेंव्हा आपला देश हा आर्थिक दिवाळीखोरीच्या गर्तेत होता. आपल्या देशाकडे तर पैसे नव्हतेच आणि जगातील इतर देशही आपल्याला कर्ज देण्यासाठी तयार नव्हते. आज आपण एका आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या देशामध्ये राहत आहोत. अभियांत्रिकीच्या विविध ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये करिअरच्या उज्वल […]
फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये ४९ वे तालुकास्तरीय ‘विज्ञान प्रदर्शन २०२२’ संपन्न
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये पंचायत समिती शिक्षण विभागाचे ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२ आयोजित करण्यात आले होते. एनसीईआरटी नवी दिल्ली भारत सरकार अन्वये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी किंवा टेक्नॉलॉजी खेळणी असा निश्चित केला असून पर्यावरणाला अनुकूल व सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन […]
किर्तनकाराच्या आत्महत्येस कारणीभूत, पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
युवा कीर्तनकार संजय मोरे यांनी १० सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणी मयत संजय मोरे यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई महादेव जाधव आणि त्यांच्या एका अनोळखी मित्र अशा इसमांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 8 सप्टेंबर रोजी आरोपी पोलीस कर्मचारी महादेव जाधव आणि सहआरोपीने एका महाराजांच्या […]
टोलनाक्यावर दोन महिलांमध्ये जोरदार राडा
सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हि़डीओ इतके शेअर केले जातात की तो आकडा पाहूनही आपण थक्क होतो. तर, काही व्हिडीओ वारंवार पाहिले जातात. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि त्यानंतर झालेली हाणामारी पाहायला मिळत आहे.ही महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली नाशिकमधील एका टोलनाक्यावर. […]
बासुंदीत झुरळ टाकून खंडणी १ लाखाची उकळली
भामट्या विरोधात गुन्हा दाखल बासुंदीत झुरळ टाकून व्हिडीओ तयार करून; दुकानाची बदनामी करण्याची धमकी देत, खंडणी उकळणाऱ्या भामट्या विरोधात नाशिकच्या दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या ‘सागर स्वीटचे’ संचालक रतन चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून 19 ऑगस्ट 2022 रोजी अजय राठोड याने सागर स्वीट या दुकानातून बासुंदी घेतली. त्यानंतर त्याने त्यात झुरळ […]
पोलीस निरिक्षकाचे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ऑडिओ क्लिप व्हायरल
एका पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवरुन बोलतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात येवून उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, किरणकुमार बकाले यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येवून त्यांचे निलंबन […]











