ताज्याघडामोडी

बासुंदीत झुरळ टाकून खंडणी १ लाखाची उकळली

भामट्या विरोधात गुन्हा दाखल

बासुंदीत झुरळ टाकून व्हिडीओ तयार करून; दुकानाची बदनामी करण्याची धमकी देत, खंडणी उकळणाऱ्या भामट्या विरोधात नाशिकच्या दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिकच्या ‘सागर स्वीटचे’ संचालक रतन चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून 19 ऑगस्ट 2022 रोजी अजय राठोड याने सागर स्वीट या दुकानातून बासुंदी घेतली. त्यानंतर त्याने त्यात झुरळ टाकून त्याचा व्हिडिओ तयार केला. तो व्हायरल करण्याची तसेच सदर माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्याची धमकी देऊन एक लाख रुपयांची खंडणीची मागणी केली केली. त्या भामट्याने, खंडणी रक्कम विद्या विकास सर्कल येथील सागर स्विटच्या ऑफिसमध्ये दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी सात वाजता खंडणीच्या स्वरूपात घेतली होती. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 384,506 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *