गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सैराट चित्रपटातील आर्चीच्या भावा विरोधात पोलीस कारवाई करणार; प्रिन्सचे धक्कादायक प्रताप उघडकीस

मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला फसवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी गजाआड केल्यानांतर या मध्ये मोठे रॅकेट असल्याचे निष्पन होत असून एका गाजलेल्या चित्रपटातील कलाकाराचा सहभाग असल्याने राहुरीचे पोलीस लवकरच प्रसिद्ध चित्रपट सैराट मधील प्रिन्स सूरज पवारच्या मुसक्या आवळणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस प्रताप दराडे यांनी दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, महेश बाळकृष्ण वाघडकर रा.भेंडा, ता. नेवासा. जि.अ.नगर याला दि ३ सप्टेंबर रोजी एक फोन आला. समोरची व्यक्ती म्हणाला की, मी श्रीरंग कुलकर्णी सामाजिक न्याय विभाग मंत्रालयातून बोलत आहे. आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तेथे तुम्ही इच्छुक असाल, तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापुर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर तयार होईल.

तेव्हा तीन लाख रुपये द्या. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न असल्याने वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली. तर ठरल्याप्रमाणे दि ४ सप्टेंबर २०२२ रोजी राहुरी बस स्थानकावर दोघांमध्ये तोंडी करार झाला आणि पहिल्या टप्प्यात त्याने आरोपीस दोन लाख रुपये दिले. तर उरलेली रक्कम ३ लाख रुपये ही नियुक्तीपत्र आल्यानंतर देण्याचे ठरले होते.

दरम्यान २ दोन दिवसानंतर तुमचे नियुक्तीपत्र हे राहुरी विद्यापीठ येथे घेऊन येऊ असे सांगितले. त्यानंतर दि ९ सप्टेंबर रोजी आरोपी तथा तोतया श्रीरंग कुलकर्णी याने विद्यापीठ येथे येणार असल्याचे सांगितल्याने फिर्यादी वाघडकर हे देखील तेथे गेले. त्यांनी सोबत तीन लाख रुपये देखील नेले होते. जेव्हा तोतया श्रीरंग कुलकर्णी हा तेथे आला. तेव्हा तो राहुरी विद्यापीठाच्या व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे थांबला होता. त्याच्याकडे काही बनावट कार्ड असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र जेव्हा आरोपी आणि फिर्यादी हे तेथे भेटले, तेव्हा आरोपीच्या काही गोष्टींचा वाघडकर यांना संशय आला. तोतया श्रीरंग कुलकर्णी याने आपली फसवणुक केली आहे, असे लक्षात आल्याने रक्कम देण्याचे टाळले व आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. राहुरी पोलिसांनी चौकशी केली असता लक्षात आले की, श्रीरंग कुलकर्णी हा कोणी व्यक्ती मंत्रालयात नसून तो व्यक्ती म्हणजे दत्तात्रय आरुण क्षिरसागर रा. दत्तनगर, मालेगाव बस स्टॅप नाशिक हा आहे. पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत.

सर्व घटना लक्षात आल्यानंतर संबंधित ऑर्डर बनविणे, बनावट ओळखपत्र बनविणे, यासाठी शिक्के आणि अन्य कागदपत्रे आवश्यक असतात. ते कोठे तयार केले ? याबाबत आरोपी याने खुलासा केला आहे. त्यानंतर त्यात आकाश विष्णु शिंदे रा. संगमनेर याचे नाव पुढे आले आहे. म्हणून पोलिसांनी पुढे तपास सुरू केला. त्यात ओमकार नंदकुमार तरटे रा. उपासनी गल्ली ता. संगमनेर या तरुणाच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. तो रबरी शिक्के तयार करण्याचे काम करतो. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यानंतर त्याच्याकडून मोठी माहिती उघड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *