लखनऊ, 28 एप्रिल : देशातील कोरोना परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की अगदी सत्ताधारी पक्षातील आमदारालाही ICU बेड मिळाला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीतील भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केसर सिंह गंगवार बरेलीतल्या नवाबगंजमधील आमदार. 18 एप्रिलला ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. […]
ताज्याघडामोडी
लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
बीड, 28 एप्रिल: बीड जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिक लस घेण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. मात्र लसीचा तुटवडा असल्याने आज जिल्ह्यात केवळ तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु होते अन्य 127 लसीकरण केंद्र लसी अभावी बंद करावे लागले. आज सकाळी आरोग्य विभागाकडे केवळ 2600 लसींचे डोस उपलब्ध होते. दुपारपर्यंत […]
पंढरपूरातही होणार कोरोना रुग्णांना आकारण्यात आलेल्या बिलांची पडताळणी
कोरोना रुग्णांवर ज्या खासगी रुग्णालयांत उपचार होत आहे अशा काही रुग्णांलयांनी शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून बिलाची आकारणी केल्यास सदर बिलांची पडताळणी करण्यात येणार असून यासाठी प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याशी संपर्क केला असता कोविड हॉस्पिटल कडून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या बिलांची पडताळणी करण्यासाठी संजय सदावर्ते यांच्यासह ५ जणांची विशेष समिती स्थापित केल्याचे सांगितले. […]
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!
अकोला ः येथील प्रसिद्ध विजय ट्रान्सपोर्टच्या मालकाला गृहमंत्र्यांच्या नावाने दहा लाखांचा हप्ता मागितल्याची तक्रार पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते १३ जणांकडे करण्यात आली आहे. यात हप्तासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देवून आठ तास स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप ट्रान्सपोर्ट संचालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध केला आहे. अकोला येथील वाशीम बायपास रोडवरील गंगानगर येथे विजय ट्रान्सपोर्टचे […]
राज्यात कडक निर्बंध 10 दिवस वाढणार?
मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी दहा दिवस लॉकडाऊन वाढवावा, असा सूर मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी मंगळवारी बैठकीत लावला. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी शिक्कामोर्तब केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. तसेच सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पुन्हा तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत, त्यामुळे आपल्याला पूर्ण तयारी करून घ्यावीच लागेल, […]
18+ लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. ही ऑनलाईन नोंदणी कुठे करायची? त्याचे रजिस्ट्रेशन केव्हा पासून सुरु होईल? या सर्वांची माहिती जाणून घेऊया… येत्या 1 मे पासून 18 ते 45 वर्षे वयोगटातील […]
डॉक्टरी पेशाला काळीमा, कोविड सेंटरमध्ये शरीरसुखाची मागणी करणारा डॉक्टर गजाआड
नागपूर, 28 एप्रिल : कोरोनाच्या संकटात डॉक्टर जिवाची बाजी लावून रुग्णांची सेवा करत आहे. पण नागपुरात डॉक्टरीपेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कोविड सेंटरमध्ये एका डॉक्टराने सहकारी महिला डॉक्टरावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. डॉ. नंदू रहांगडाले असं या डॉक्टराचं […]
स्पुटनिक व्ही 1 मेपासून भारताला मिळणार
नवी दिल्ली : रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे या लशीला परवानगी देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. ही लस 1 मेपासून भारताला मिळणार आहे. परंतु, या लशीचे किती डोस मिळणार आणि त्यांची किंमत किती याबाबत अद्याप काहीच जाहीर करण्यात आलेले नाही. या लशीच्या किंमत जागतिक […]
आढीवचे मा.सरपंच दिनकर चव्हाण यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही जोपासली माणुसकी
कोरोना विरोधातील या लढाईत जसे शासन लढा देत आहे तसेच राज्यातील अनेक कोरोना योद्धे कोरोना बाधितांना,त्यांच्या कुटूंबाना मदतीचा हात देत असल्याचे दिसून आले.तर ज्यांना थेट ग्राउंडवर उतरून काम करणे शक्य नाही असे अनेक लोक राज्यशासनाकडे आर्थिक मदत सोपवून आपले कर्तव्य पार पाडत आलेले दिसून आले.यात जसा मोठमोठे उद्योगपती,व्यवसायिक यांचा समावेश आहे तसा अनेक सामान्य नागिरकांचा,शेतकऱ्यांचाही समावेश आहे.याचेच […]
मोक्क्यातील आरोपी दीप्ती काळेची पुण्यात आत्महत्या
दीप्ती काळे या महिलेने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या 8व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. दीप्ती काळे ही महिला मोक्क्याच्या गुन्ह्यातील आरोपी होती. तिच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. दीप्ती काळे हिच्यावर पुण्यातील नामवंत सराफासह अनेक नागरिकांना ब्लॅकमेल केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच खंडणीचाही तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीप्ती काळेवर […]











