ताज्याघडामोडी

आढीवचे मा.सरपंच दिनकर चव्हाण यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही जोपासली माणुसकी 

कोरोना विरोधातील या लढाईत जसे शासन लढा देत आहे तसेच राज्यातील अनेक कोरोना योद्धे कोरोना बाधितांना,त्यांच्या कुटूंबाना मदतीचा हात देत असल्याचे दिसून आले.तर ज्यांना थेट ग्राउंडवर उतरून काम करणे शक्य नाही असे अनेक लोक राज्यशासनाकडे आर्थिक मदत सोपवून आपले कर्तव्य पार पाडत आलेले दिसून आले.यात जसा मोठमोठे उद्योगपती,व्यवसायिक यांचा समावेश आहे तसा अनेक सामान्य नागिरकांचा,शेतकऱ्यांचाही समावेश आहे.याचेच एक उदाहरण म्हणजे आदीवचे माजी सरपंच दिनकर चव्हाण होय.आज त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ हजाराचा मदतीचा धनाकर्ष तहसीलदार पंढरपुर यांच्याकडे सुपूर्द करून आपला खारीचा वाटा उचलला आहे.   

भैरवनाथ बहुद्देशीय अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून दिनकर चव्हाण हे अतिशय प्रशंसनीय काम करीत आले असून गतवर्षीही त्यांनी गतवर्षी ३०मार्च २०२० रोजी त्यांनी अशाच प्रकारे ५१ हजार रुपये इतक्या मदतीचा धनाकर्ष मुख्यमंत्री सहायता निधीस दिला होता.तर विठ्ठल मंदिराच्या गोशाळेस व मंगळवेढा येथील चारा छावणीस त्यांनी मोफत हिरवा चाराही उपलब्ध करून दिला होता.तर याही वेळेस ते ५० क्विटल चरा मंदीर समितीच्या गोशाळेस उपलब्ध करून देणार आहेत.दिनकर चव्हाण यांच्या या मदतीमुळे पंढरपुर शहर तालुक्यातील सपंन्न मंडळींसमोर मोठा आदर्श ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *