नशा करण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून रिक्षाचालक पतीने आपल्याच पत्नीला चालू रिक्षातून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पती एवढ्यावरच न थांबता त्याने पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी घरी आणले आणि तिला रॉडच्या सहाय्याने पुन्हा दोन वेळा मारहाण केली. सध्या महिलेच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. […]
ताज्याघडामोडी
नातींना भेटण्यासाठी आजोबा शाळेत आले, दहावीच्या विद्यार्थिनाला जवळ बोलवून लज्जास्पद वर्तन
नातींना भेटण्यासाठी आलेल्या आजोबांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप होत आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकार घडल्यानंतर गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने, प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल […]
नगरसेवकाने केली घाणेरडी मागणी
अभिनेत्रीने शिकविला धडा पुण्यात सिंहगड रोडवर एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये रहात असताना आपार्टमेन्टचा मालक असलेल्या नगरसेवकाने अभिनेत्री तेजस्विनी पंडित या भाडे देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेल्या असता त्यांना थेट ‘ऑफर’ दिली’ असल्याची धक्कदायक माहिती तेजस्विनी पंडित यांनी माध्यमाशी बोलताना दिली. मात्र नगरसेवकाने अशी मागणी करताच टेबलावर पाण्याचा ग्लास होता, तो उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला. मी […]
देव्हाऱ्यातील दिव्याने आग भडकली, हजारोंच्या नोटा जळून खाक, पोलीस भरतीचं स्वप्नही धूसर
देव्हाऱ्यातील दिव्यामुळे घरात आग भडकून होत्याचं नव्हतं झालं. जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या आंबेडकर नगरात ही घटना घडली. आज (सोमवारी) १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दोन घरांना अचानक आग लागली. यामध्ये घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. इतकंच नाही, तर नुकतेच मिळालेले कामाचे पैसेही जळून खाक झाल्याने कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. […]
माझी बायको छळतेय, पुरुष आयोग स्थापन करा, एक नव्हे आल्या 584 तक्रारी!
बायकोकडून ही नवऱ्याचा छळ केला जातो, याच्या तक्रारी आता भरोसा सेल आणि महीला समुपदेशन केंद्राकडे येऊ लागल्या आहेत. पुरूषच छळ करतो असे नाही तर महिलाही छळ करत असल्याच्या तक्रारी होत आहेत. गोंदिया जिल्ह्यात दहा वर्षात तब्बल 584 पुरूषांचा बायकोकडून छळ करण्यात आल्याच्या तक्रारी भरोसा सेल आणि महिला समुपदेशन केंद्राकडे आल्या आहेत. तर आता महिला आयोगाप्रमाणे […]
खायचं असेल तर खा; मटणाच्या ग्रेव्हीचा वाद टोकाला; हॉटेल मालकाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण
मटणाची ग्रेव्ही चांगली नसल्याची तक्रार केल्याने झालेल्या वादातून हॉटेल चालकाने शटर बंद करून तिघा पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये ही घटना घडली. कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील कर्मचारी किरण साबळे व त्यांचे दोन सहकारी यांच्यासोबत ही घटना घडली […]
अभिनेत्याकडून शिक्षिकेचं लैंगिक शोषण; इंटिमेट फोटो लीक करण्याची धमकी देत उकळले पैसे
मुंबई पोलिसांनी टीव्ही अभिनेता अमित अंतिलविरोधात धमकावणं, लैंगिक शोषण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण मुंबईतल्या एका शिक्षिकेनं मलबार हिल पोलीस ठाण्यात अमितविरोधात तक्रार दाखल केली. इंटिमेट फोटो सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचा आरोप संबंधित शिक्षिकेनं केला. पैसे दिले नाही तर मुलाचा जीव घेण्याची धमकी त्याने महिलेला दिली. अमित अंतिलने टेलिव्हिजनवरील […]











