अभिनेत्रीने शिकविला धडा
पुण्यात सिंहगड रोडवर एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये रहात असताना आपार्टमेन्टचा मालक असलेल्या नगरसेवकाने अभिनेत्री तेजस्विनी पंडित या भाडे देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेल्या असता त्यांना थेट ‘ऑफर’ दिली’ असल्याची धक्कदायक माहिती तेजस्विनी पंडित यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
मात्र नगरसेवकाने अशी मागणी करताच टेबलावर पाण्याचा ग्लास होता, तो उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला. मी अशा गोष्टी करण्यासाठी या क्षेत्रात प्रवेश केला नाही, अन्यथा मी भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहिले नसते. मी घरं आणि दारात गाड्या उभ्या केल्या असत्या, असं नगरसेवकाला सुनावल्याचं तेजस्विनी पंडित यांनी सांगितले.
“माझ्या व्यवसायामुळे आणि माझी आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांनी माझ्या बाबतीत हे धाडस केलं. पण माझ्यासाठी हा एक शिकण्याचा अनुभव होता.”असंही त्या म्हणाल्या.
तेजस्विनी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या आहे. तेजस्विनीने २००४ मध्ये केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून पदार्पण केले. मी सिंधुताई सपकाळ, तू हि रे, देवा, एकतारा यासारख्या अनेक चित्रपटात ती झळकली आहे. याशिवाय रानबाजार, समांतर या तिच्या वेबसीरिजही गाजल्या आहेत. एकाच या जन्मी जणू, लज्जा यासारख्या मालिकांतूनही तिने अभिनय केला आहे.