खरपुडी शिवारातील हरी गोविंद नगर येथे त्यांनी आपल्या राहत्या घरात सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद माजीद, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, हेड कॉन्स्टेबल संदीप बेराड यांच्यासह पालीकेचे मुख्याधीकारी, अधिकारी कर्मचारी तसेच अनेक नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह […]
ताज्याघडामोडी
सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 79 व्या जयंती निमित्त.., तुंगत मध्ये मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिर
सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 79 व्या जयंती निमित्त मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिराचे आयोजन पंढरपूर तालुक्यात दि.29/01/2023 ते 05/01/2023 या कालवधीत विभागवार पटवर्धनकुरोली, तुंगत, कासेगांव, तसेच भाळवणी कारखाना साईटवर केलेले आहे. त्या अनुषंगाने दि.01/02/2023 रोजी तुंगत येथील शिबीरात 270 रुग्ण तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी तुंगत ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ सौ […]
प्रेयसी फोन उचलत नाही म्हणून प्रियकर तापला, रस्त्यात गाठलं अन् विषारी औषध पाजलं
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे विषारी औषध पाजून १९ वर्षीय प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी फोन उचलत नाही, बोलत नाही या गोष्टीचा राग मनात धरून २२ वर्षीय तरुणाने हे कृत्य केलं. इतकंच नाही तर त्याने स्वत: देखील विषारी औषध घेऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दोघांनाही उपचारांसाठी सेवाग्राम रुग्णालयात […]
हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला, फसवा, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा; अजित पवारांची घणाघाती टीका
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. अनेक आकर्षक घोषणा असलेल्या या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी मोठे स्वागत केलेले असताना दुसरीकडे विरोधकांनी या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या अर्थसंकल्पावर टीका करत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. लोकसभा आणि देशातील ९ राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यापुढे […]
ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा, बचत योजनेतील मर्यादा वाढवली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अर्थसंकल्प सादर केले.आपल्या ८७ मिनिटांच्या भाषणात त्यांनी विविध क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती दिली. तसंच, अनेक नव्या घोषणाही करण्यात आल्या. त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिकता देत त्यांच्यासाठी असलेली बचत मर्यादा दुपट्टीने वाढवली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत खाते योजनेची मर्यादा १५ लाखांवरून […]
अहवालानंतर गौतम अदानींनी मान उंचावली, जगातील श्रीमंतांच्या यादीत पुन्हा केला फेरबदल
हिंडेनबर्गच्या दणक्यातून अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांचा अदानी समूह सावरताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर शेअर बाजारात तीन दिवसांच्या मोठ्या तोट्यानंतर मंगळवारी समूहाचे बहुतांश शेअर्स तेजीत व्यवहार करताना दिसले. त्यामुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली असून ते पुन्हा एकदा जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत परतले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, मंगळवारी […]
चारित्र्याच्या संशयावरुन बायकोला संपवलं, भररस्त्यात धक्कादायक कृत्य; चिमुकल्यांनी फोडला टाहो
चारित्र्याच्या संशयावरून गळा चिरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे घडली आहे. पत्नीची हत्या करत पतीने स्वतःवर देखील वार केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ममता देवी प्रसाद (वय ४०) असे मृत महिलेचं नाव आहे. बोईसर येथील दांडीपाडा परीसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. भर रस्त्यात पतीने आपल्या […]
पाच वर्षांचा चिमुकला वर्गात मस्ती करत होता, शिक्षकाला राग आला; लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
वर्गात मस्ती करीत असताना एका पाच वर्षीय मुलाचा शिक्षकाला राग आला. शिक्षकाने या पाच वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. निरंजन थापा या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मारहाण करणाऱ्या वासनांध शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेनंतर पालक संताप व्यक्त केला आहे आणि शिक्षकास […]
थँक यु देवेंद्रजी ! पंढरपूरकरांचे ६० वर्षाचे स्वप्न पूर्ण होणार आहे
पंढरपूर -फलटण रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार ९२१ कोटीचा वाट उचलणार पंढरपूर हे तीर्थक्षेत्र,वारकरी सांप्रदायिक याला भूवैकुंठ म्हणत आले आहेत.खरे तर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र ब्रॉडगेज रेल्वे मार्गाने जोडले जावे हे स्वर्गीय माजी आमदार तात्यासाहेब डिंगरे यांचे स्वप्न होते.१९९३ साली तत्कालीन राष्ट्रपती शंकरद्याल शर्मा हे विठ्ठलभक्त असल्याने नेहमी प्रमाणे पंढरपूरला आले आणि त्यांनी कुर्डुवाडी-मिरज ब्रॉडगेज मार्गासाठी शब्द […]
असाराम बापू याला जन्मठेप, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण
असाराम बापू याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सन 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाने ही शिक्षा मंगळवारी (31 जानेवारी) सुनावली. न्यायालाने राखून ठेवलेला निर्णय आज दिला. आसारामच्या एका माजी शिष्याच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात ही शिक्षा ठोठावण्यात आली. आसाराम बापू आणि इतर सहा जणांविरोधात अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआर (प्रथम माहिती […]











